अभिनेत्री मलायका अरोरा हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मलायका-अर्जुन यांना एक मुलगा देखील आहे. सांगायचं झालं तर, मलायका हिने स्वतःच्या शोमध्ये घटस्फोटाच्या पहिल्या रात्री काय झालं होतं. याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मलायका आणि अरबाज यांना 1998 मध्ये लग्न केलं होतं. पण दोघांचं नातं शेवटपर्यंत टिकू शकलं नाही. दरम्यान, ‘मूविंग इन विद मलायका’ शोमध्ये घटस्फोटबद्दल मोठा खुलासा केला होता.
अरबाज याला घटस्फोट देण्याचा मलायका हिचा निर्णय कुटुंबियांना मान्य नव्हता. एवढंच नाहीतर, अरबाजसोबत लग्न का केलं? याचं कारण देखील अभिनेत्री सांगितलं होतं. मलायका हिला घरातून बाहेर पडायचं होतं आणि स्वतःची ओळख निर्माण करायची होती.
‘माझा आणि अरबाजचा घटस्फोट होऊ नये अशीच सर्वांची इच्छा होती. कोणी तुम्हाला म्हणणार नाही की जा आणि घटस्फोट घ्या… घटस्फोटाच्या पहिल्या रात्री सर्वांनी मला सांगितलं, जो काही निर्णय घेशील विचार करुन घे… तुला तुझ्या करियरवर 100 टक्के विश्वास आहे का?’
‘जी लोकं आपली काळजी करतात तेच असे प्रश्न विचारतात… जर तू घटस्फोटाचा निर्णय घेणार आहेत तर, तुझ्यावर आम्हाला गर्व आहे. कारण तू एक सशक्त महिला आहेस. अशा शब्दांमुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढला…’ मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत.
दरम्यान, मुलगा अरहान खान याच्या शोमध्ये देखील मलायका हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं होतं. अरहान याने आईला विचारलं होतं, तू लग्न कधी करणार आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यावर मलायका म्हणाली होती, ‘मी प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नीहा. मला नाही वाटत याचं काही उत्तर असेल. मला असं वाटतं मी सध्या उत्तम आयुष्य जगत आहे…’
मलायका हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता अरबाज दुसऱ्या पत्नीसोबत आनंदी संसार करत आहे. तर मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.