नवी दिल्ली- सबस्क्रायबर्सची घटती संख्या नेटफ्लिक्स (NETFLIX) समोर चिंतेचा विषय बनली आहे. जागतिक आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला भारतात अद्यापही सूर गवसलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रतिस्पर्धांकडून मोठ्या प्रमाणात धोबीपछाड मिळत आहेत. भारतीय बाजारात नेटफ्लिक्सची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होत आहे. भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात नेटफ्लिक्स अपय़यशी ठरत असल्याचं देखील मत अभ्यासकांनी वर्तविलं आहे. नेटफ्लिक्सवरील कंटेटला जागितक स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजच्या (NETFLIX WEBSERIES) प्रतीक्षेत जगभरातील प्रेक्षक असतो. मात्र, भारतीय ग्राहकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी कंटेट निर्मितीला (CONTENT CREATION) नेटफ्लिक्सला संघर्ष करावा लागत आहे. भारतात नेटफ्लिक्स अपयशी ठरण्यामागं प्लॅनच्या वाढत्या किंमती, भारतीय केंद्रित कंटेटचा अभाव आणि थिंक टँकला सोडचिट्ठी ही तीन प्रमुख कारण सांगितली जातात.
Our watchlist for the rest of this month? It’s looking Great, Man ? pic.twitter.com/qQAZM3X19e
— Netflix India (@NetflixIndia) July 16, 2022
अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने प्लॅनच्या किंमतींना कात्री लावण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2021 मध्ये नेटफ्लिक्सने 18-60% दराने प्लॅन दरात कपात केली. मात्र, भारतातील 60 सहस्पर्धक कंपन्यांचे वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन नेटफ्लिक्सच्या मासिक प्लॅनपेक्षाही स्वस्त असल्याचं समोर आलं होतं. नेटफ्लिक्सच्या पिछाडीमागे प्रमुख कारणांत भारतीय सबस्क्रायबर्सच्या आवाक्याबाहेरील प्लॅनच्या किंमती असल्याचं सांगितलं जातं. छोट्या शहरांत एकवटलेल्या वर्गाच्या आवाक्याबाहेर आहेत.
नेटफ्लिक्सच्या थिंक टँकला गळती लागली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सोडचिट्ठीचं सत्र कायम आहे. सृष्टी बेहल आर्या, आशिष सिंग, अभिषेक व्यास, दिव्या पाठक या थिंक टँक मधील मंडळींनी नवी वाट शोधली आहे. नेटफ्लिक्स कडून नव्या संकल्पनांचे स्वागत होत नसल्याचे महत्वाचं कारण राजीनाम्यामागं दडलं असल्याचं सांगितलं जातं.
नेटफ्लिक्सच्या भारतातील आगमनाला साडेसहा वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या तीन वर्षापासून स्थानिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचं धोरणाला नेटफ्लिक्सनं गती दिली आहे. भारतात अंदाजित 70% टीमची बांधणी कोविड काळात करण्यात आली. भारतात सदस्यांसोबत प्रतिबद्धता, महसूल आणि सबस्क्रायर्स संख्येत संभाव्य वाढ हे उद्दिष्ट असल्याचं नेटफ्लिक्सच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
· डिस्ने+ हॉटस्टार – 50
· अमेझॉन प्राईम व्हिडिओ- 22
· सोनी लिव्ह – 6.8
· झी5- 6.5
· नेटफ्लिक्स- 5
· डिस्ने: 17%
· प्राईम व्हिडिओ: 20%
· नेटफ्लिक्स : 20%
· झी 5 : 9%
· सोनी लिव्ह : 4%
· अल्ट बालाजी : 4%