अखेर शाहरुख खानने स्वत:ला का मानलं होतं ‘गे’?; म्हणाला “मी ज्या अभिनेत्रींसोबत काम करतो..”

| Updated on: Nov 02, 2023 | 1:53 PM

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला आहे. या मुलाखतीत शाहरुखने स्वत:ला चक्क 'गे' म्हणजेच समलैंगिक असल्याचं मानलं आहे. यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे.

अखेर शाहरुख खानने स्वत:ला का मानलं होतं गे?; म्हणाला मी ज्या अभिनेत्रींसोबत काम करतो..
Shah Rukh Khan
Follow us on

मुंबई : 2 नोव्हेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खानला रोमान्सचा किंग म्हटलं जातं. त्याने बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. इंडस्ट्रीत इतकी वर्षे राहूनही त्याचं नाव कोणत्याच अभिनेत्रीशी जोडलं गेलं नाही. याविषयी शाहरुखला जेव्हा एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याचं उत्तर ऐकून सर्वजण चकीत झाले होते. शाहरुखला या मुलाखतीत विचारलं गेलं होतं की, तुझं नाव आजपर्यंत कोणत्याच अभिनेत्रीशी जोडलं गेलं नाही, असं का? यावर उत्तर देताना किंग खान म्हणाला की तो ‘गे’ (समलैंगिक) आहे आणि कदाचित सर्वांना असंच वाटतं.

इंडस्ट्रीतल्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत नाव जोडण्याबद्दल शाहरुख म्हणाला, “मला असं वाटतं की मी गे आहे. सर्वजण मला हाच प्रश्न विचारतात की तुझं नाव हिंदी फिल्म हिरोइनसोबत का जोडलं गेलं नाही? मला त्याचं उत्तर खरंच माहीत नाही. ते सर्वजण माझे चांगले मित्र आहेत. मी नेहमी हेच उत्तर देतो की त्यांच्यासोबत मी काम करतो. मी माझ्या पत्नीसोबत खूप खुश आहे आणि इतर अभिनेत्रींसोबत मी फक्त काम करतो. ते सर्वजण स्वभावाने खूप चांगले आहेत. त्या सर्वांशी माझी चांगली मैत्री आहे. त्यांच्यासोबत काम करताना मी बराचसा वेळ त्यांच्यासोबत व्यतित करतो. ते माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी जातो. मला त्यांचे फोन येतात. आम्ही प्रोफेशनली आणि पर्सनली पण एकमेकांची मदत करतो. कारण आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेतो.”

पहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

याविषयी शाहरुख पुढे म्हणतो, “मला कधीच त्यांच्याविषयी चुकीचं वाटलं नाही. मला फक्त इतकंच माहीत असतं की मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. त्यांच्यासोबत मला अफेअर किंवा प्रेम करायचं नाहीये. मला भविष्यातही त्यांच्यासोबत चांगलं काम करायचं आहे.” अशा प्रकारे किंग खानने स्पष्ट केलं की तो अभिनेत्रींसोबत मैत्रीपूर्ण नातं ठेवतो. पण त्या नात्याची मर्यादा त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असते. ते सर्वजण फक्त सहकलाकार आहे, हेच लक्षात ठेवून तो त्यांच्यासोबत काम करतो.