मुंबई : मॉडेल उर्फी जावेद (urfi avoid) कायम तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. ज्यामुळे मॉडेलला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. विचित्र कपडे घालून कायम सोशल मीडियावक चर्चेत असणारी उर्फी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. काही जणांना उर्फीचा अंदाज आवडतो, तर काही मात्र कायम तिला विरोध करत असतात. पण आता उर्फीने एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. उर्फीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं दिसत आहे.महत्त्वाचं म्हणजे खुद्द अभिनेत्रीने शरीरावर झालेल्या जखमांचं कारण सांगितलं आहे.
फोटो शेअर करत उर्फी म्हणते, ‘जेव्हा मी पूर्ण कपडे घातले, तेव्हा मला अशी अडचण येते. जेव्हा पूर्ण किंवा वुलनचे कपडे घालते, तेव्हा मला एलर्जी होते. ही माझ्यासाठी फार मोठी अडचण आहे. आता तुम्हाला देखील समजलं असेल की का पूर्ण कपडे घालत नाही. पुरावा तुमच्या समोर आहे…’ सध्या उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, उर्फीच्या विचित्र कपड्यांमुळे सध्या सर्वत्र वादग्रस्त वातावरण आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर उर्फीच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फीवर निशाणा साधला होता. त्यानंतर उर्फीने देखील त्यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिलं. चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादानंतर अनेकांनी मॉडेलवर आक्षेप घेतला आहे.
उर्फीबद्दल सांगायचं झालं तर, तिने सुरूवातील मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण तिला लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देखील झळकली, पण बिग बॉसच्या घरातून देखील उर्फीच्या नशीबात निराशा आली. त्यांनंतर उर्फीच्या कपड्यांची तुफान चर्चा रंगली. अखेर उर्फीची फॅशनच तिची ओळख झाली.
मीडियारिपोर्टनुसार उर्फीची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा अधिक आहे. उर्फी दर महिन्याला २ ते ५ मिलियन कमाई करते. मुंबईतील तिच्या आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाडीची कायम चर्चा होत असते.
आयुष्यात आलेल्या संघर्षानंतर उर्फीने कमी वयात आणि कमी कालावधीत मुंबईमध्ये नाव आणि कोट्यवधींची माया कमावली. पण आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत असलेला वाद उर्फीला कुठे घेवून जाईल सांगता येत नाही. चित्रा वाघ यांच्याकडून होत असलेल्या टीकेला उर्फी देखील सडेतोड उत्तर देत आहे.