मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. कतरिना आणि विकी यांनी कोणत्याच सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली नाही. पण दोघे कायम सोशल मीडियाच्या माध्यामातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील विकी आणि कतरिना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दरम्यान, दोघांच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना यांच्या नात्यातील एक गोष्ट चाहत्यांच्या लक्षात येत आहे..
गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही कार्यक्रमात विकी कौशल एकटा जातो. त्याच्यासोबत पत्नी कतरिना कैफ नसते. म्हणून दोघांमध्ये सर्व काही ठिक तर आहे ना? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय अनेकांनी कतरिना प्रेग्नेंट असल्याचा देखील अंदाज वर्तवला आहे. पण कतरिना आणि विकी यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कतरिना प्रग्नेंट असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहत नसल्याची चर्चा रंगत आहे. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याची माहिती देखील समोर येत आहे. कतरिना प्रेग्नेंट नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे व्यस्त आहे. सुत्रांनी अभिनेत्रीच्या प्रग्नेंसीच्या अफवा फेटाळल्या आहेत.
अभिनेत्री तिच्या कामांमध्ये खूप व्यस्त आहे, त्यामुळे कामानिमित्त ती अनेक शहरांमध्ये फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिना मुंबईत नाही. कतरिना तिच्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये आणि इतर कामांमध्ये व्यस्त आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना आणि राघव यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.
कतरिना कैफ हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झाल तर अभिनेत्री लवकरच सलमान खान स्टारर ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘टायगर ३’ शिवाय अभिनेत्री ‘जी ले जरा’ आणि ‘मेरी क्रिसमस’ सिनेमात देखील महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती. आता सोशल मीडियावर विकी-कतरिना एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.