जगभरात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2022) सोहळ्यात निवेदक क्रिस रॉकला (Chris Rock) कानाखाली मारल्यानंतर अभिनेता विल स्मिथने (Will Smith) सोशल मीडियाद्वारे माफीनामा जारी केला आहे. आपली कृती ही लज्जास्पद आणि मर्यादेपलीकडची होती, असं त्याने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाच्या टकलेवरून रॉकने मस्करी केली. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. त्यामुळे तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली.
कोणत्याही प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यातील माझं वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होतं. माझ्या खर्चावर विनोद करणं हा कामाचा एक भाग आहे असं मी समजू शकतो, परंतु जाडाच्या मेडिकल कंडिशनबद्दल विनोद केलेलं मला सहन झालं नाही आणि भावनेच्या अधीन झाल्याने मी तसा वागलो. मला जाहीरपणे तुझी माफी मागायची आहे क्रिस. माझी वागणूक मर्यादेपलीकडची होती आणि मी चुकलो. या प्रेमळ जगात हिंसेला स्थान नाही. मी अकॅडमी, शोचे निर्माते, सर्व उपस्थित पाहुणे आणि जगभरातील प्रेक्षकांची माफी मागतो. मी विलियम्स आणि माझ्या किंग रिचर्डच्या कुटुंबीयांची माफी मागतो. माझ्या या वागण्यामुळे त्या सुंदर प्रवासावर एक डाग पडला. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतोय”, अशा शब्दांत त्याने माफी मागितली.
सोमवारी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने विलच्या या कृतीचा निषेध केला आणि क्रिसला कानाखाली मारल्याबद्दल चौकशी सुरू केली. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने रविवारी सांगितलं की त्यांना या घटनेची माहिती होती परंतु त्याविषयी ते तपास करू शकत नाही, कारण प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने पोलिस तक्रार दाखल करण्यास नकार दिला.
हेही वाचा:
श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार
‘अनुपमा’मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने देवाचं कारण देत अभिनयक्षेत्राला केला रामराम!