मुंबई : ऑस्कर 2022 नंतर विल स्मिथ (Will Smith) जगभरामध्ये चर्चेत आला. कारण यंदा ऑस्कर पुरस्कारपेक्षाही विल स्मिथने लगावलेली कानाखाली चर्चेत होती. विशेष म्हणजे आज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) विल स्मिथला पाहिले गेले आहे. यावेळी विल स्मिथसोबत भगवे कपडे घातलेले एक साधू देखील दिसले. यावरून एक अंदाजा बांधला जात आहे की, तो भारतामध्ये (India) कुठल्यातरी धार्मिक कार्यक्रमासाठी आला होता. मात्र, विल स्मिथ नेमक्या कोणत्या कार्यक्रमासाठी आणि कुठल्या शहरामध्ये आला होता, याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये. विल स्मिथ या अगोदरही भारतामध्ये आला होता.
विल स्मिथचे भारताशी खास नाते आहे. हरिद्वारशी त्यांचा जवळचा संबंध आहे. विल स्मिथ यापूर्वी 2018 मध्ये भारतात आला होता. त्यानंतर तो हरिद्वारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केला. तेथे त्यांनी गंगा आरती देखील केली होती. विल स्मिथची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे. स्मिथने आपले भविष्य देखील जाणून घेतले होते. शिवाय जन्मपत्रिकाही बनवली होती. इतकंच नाही तर विल स्मिथ देखील ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांना भेटायला आला होता. या भेटीचे फोटोही त्यावेळी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो सद्गुरु जग्गी वासुदेव महाराज यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहेत. 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूड अभिनेत्याने द रॉकला कानाखाली लगावली होती आणि त्यानंतर विल स्मिथच्या अडचणी वाढल्या आहेत. तेव्हापासून स्मिथला सर्व बाजूंनी त्रास सहन करावा लागला आहे. विल स्मिथ यांचा अडचणी वाढत असताना तो भारतामध्ये आला आणि नेमके स्मिथचे भारतामध्ये येण्याचे कारण नेमके काय? यावर आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
संबंधित बातम्या :
Sidharth-Kiara Breakup | सिद्धार्थ-कियारा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का…