स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच मालिकेविषयी पोस्ट लिहिली आहे. त्यांना या मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर तीन महिन्यांत ही मालिका रसातळाला गेल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. यावरूनच आता मालिका बंद होतेय की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. मालिकेला अपेक्षित असा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि प्राइम टाइममधून ती काढून टाकल्याने आता मुलगी झाली हो ही मालिका बंद होणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता वाहिनीने स्पष्टीकरण दिलं आहे.
मुलगी झाली हो ही मालिका रात्री नऊ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित व्हायची. मात्र त्या जागी आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. पण त्यामुळे मुलगी झाली हो ही मालिका बंद होणार नाही. तर या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता नव्या वेळेत म्हणजेच दुपारी दोन वाजता प्रसारित होईल, असं वाहिनीने स्पष्ट केलं आहे.
सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. किरण मानेंच्या राजकीय भूमिकेची चर्चा असतानाच मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून त्यांच्यावर वेगळेच आरोप करण्यात आले होते. सेटवरील गैरवर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचं प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं. राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली. आता पुन्हा एकदा किरण माने यांनी फेसबुकवर मालिकेविषयी एक पोस्ट लिहिली आहे. अवघ्या तीन महिन्यात ही मालिका रसातळाला गेल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. मुलगी झाली हो या मालिकेला प्राइम टाइममधून काढून टाकण्यात आलं असून आता ही मालिका दुपारी प्रसारित होणार असल्याचंही त्यांनी यात म्हटलंय.
हेही वाचा:
पन्नाशी ओलांडल्यानंतरही मिलिंद सोमणसारखं फिट राहायचंय? तर वाचा त्याने दिलेला हा लाखमोलाचा सल्ला
Rupali Ganguly: “.. तेव्हा वडिलांना घर विकावं लागलं”; ‘अनुपमा’ने सांगितला कुटुंबीयांचा संघर्ष