World Cup 2023: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना होण्यापूर्वी ‘तारक मेहता..’चा सीन व्हायरल

| Updated on: Nov 17, 2023 | 3:50 PM

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात ICC वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम आठव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली. तर टीम इंडिया चौथ्यांदा अंतिम फेरीमध्ये दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पाचवेळा तर भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.

World Cup 2023: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना होण्यापूर्वी तारक मेहता..चा सीन व्हायरल
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 17 नोव्हेंबर 2023 | वनडे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियापुढे रविवारी ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेवर तीन गडी राखून मात केली. अशाप्रकारे त्यांनी आठव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं जातं. त्यामुळे टीम ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाची अंतिम लढत पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. सोशल मीडियावर सध्या #INDvsAUS #ICCWorldCup2023 #BCCI #CWC2023Final हे हॅशटॅग्स तुफान ट्रेंड होत आहेत. यादरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

तारक मेहतामधील एक सीन शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मी आणि माझी फॅमिली.. वर्ल्ड कप मॅचच्या आधी’. टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकेच्या एका जुन्या एपिसोडमधील हा व्हिडीओ आहे. यामध्ये जेठालाल आणि दयाबेन यांच्यासोबत संपूर्ण गोकुळधाममधील लोक हवन करताना दिसत आहेत. टीम इंडियाच्या विजयासाठी ते पूजा-हवन करत प्रार्थना करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सध्या संपूर्ण भारतीयांची हिच अवस्था असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

2003 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताचा सामना झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात करत जेतेपद पटकावलं होतं. आता तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा दोन्ही टीम आमनेसामने येणार आहेत. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील या अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल.

अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. या सामन्याचा थरार वाढवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज झालं आहे. भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण विमाने चित्तथरारक प्रात्यक्षिक सामना सुरु होण्यापूर्वी दाखवणार आहे. हवाई दलाची सूर्यकिरण टीम एरोबेटिक प्रदर्शन सामना सुरु होण्यापूर्वी करणार आहे.