मुंबई : 15 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने अखेर माफी मागितली आहे. पत्रकार परिषदेत क्रिकेटबद्दल बोललं जात होतं आणि माझी जीभ घसरली, अशी कबुली अब्दुल रझाकने दिली. “क्रिकेटबद्दल बोलताना माझ्या तोंडून चुकून ऐश्वर्याजींचं नाव निघालं. मी त्यांची माफी मागतो. मला दुसरंच उदाहरण द्यायचं होतं, पण तोंडून त्यांचं नाव चुकून निघालं”, अशा शब्दांत त्याने माफी मागितली. वर्ल्ड कप 2023 मधील पाकिस्तान क्रिकेट टीमच्या निराशाजनक परफॉर्मन्सवर टिप्पणी करताना अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर (पीसीबी) टीका केली आणि त्या ओघात अभिनेत्री ऐश्वर्या रायचं नाव घेतलं.
पीसीबीच्या उद्देशांवर प्रश्न उपस्थित करत टीका करताना अब्दुलने ऐश्वर्याचं नाव घेत उदाहरण दिलं. “जर तुम्ही विचार करत असाल की ऐश्वर्याशी (राय) लग्न केल्याने चांगली आणि प्रामाणिक मुलं जन्माला येतील, तर असं कधीच होणार नाही. म्हणूनच तुम्हाला आधी तुमचा उद्देश नीट ठरवावा लागेल”, असं तो म्हणाला. पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या माध्यमांकडून त्याला जेव्हा वर्ल्ड कपमधील टीमच्या परफॉर्मन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने हे वक्तव्य केलं. अब्दुल रझाकने ऐश्वर्याचं नाव जोडत आक्षेपार्ह टिप्पणी केली.
Former Pakistan cricketer Abdul Razzaq has now apologised to Aishwarya Rai for his comments last night. Aik yeh slip of tongue pata nahin kese aajata hay, khair dair aye durust aye 💯💯 #CWC23 #AbdulRazzaq #AishwaryaRai pic.twitter.com/gzAdlotWXK
— Farid Khan (@_FaridKhan) November 14, 2023
पत्रकार परिषदेत जेव्हा अब्दुल रझाकने अशा पद्धतीची टिप्पणी केली, तेव्हा त्याचे सहकारी शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल तिथेच उपस्थित होते. त्यांनी या टिप्पणीवर आक्षेप न घेता त्याचा आनंद घेतला आणि उलट टाळ्याही वाजवल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यावरून नेटकऱ्यांनी अब्दुल रझाकवर बरीच टीका केली. या टीकेनंतर त्याने ऐश्वर्याची माफी मागितली.
This is why don’t lecture Sehwag or Gambhir when they treat these Pakistanis with contempt and scorn that they deserve.
As Razzaq makes Hinduphobic and misogynist comments citing Aishwarya Rai, Shahid Afridi amd Umar Gul are seen laughing and applauding pic.twitter.com/LTRKHq9B5J
— Brutal Truth (@sarkarstix) November 14, 2023
वर्ल्ड कप सुरू झाल्यावर पाकिस्तान क्रिकेट टीम हे सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र पाकिस्तानला नवख्या अफगाणिस्तान संघाने चारीमुंड्या चीत केलं होतं. कारण लीग स्टेजमधील सामन्यात अफगाणिस्तान संघ पाकला पुरून उरला होता. एकंदरित पाकिस्तान क्रिकेट टीमची कामगिरी पाहून बाबर आझमला कर्णधारपदावरून काढण्याची मागणीसुद्धी केली जात आहे.