अभिषेक बच्चन, निम्रत कौर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘दसवी’ (Dasvi) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अशातच अभिनेत्री यामीने (Yami Gautam) चित्रपटाच्या एका रिव्ह्यूवरून संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटात यामी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतेय. हे रिव्ह्यू (Dasvi Review) अनादर करणारे असल्याची भावना तिने ट्विटरवर व्यक्त केली. त्यात तिने असंही नमूद केलं की करिअरच्या या मार्गावर पोहोचण्यासाठी तिने कोणाच्याही मदतीशिवाय कठोर परिश्रम करत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्याचप्रमाणे तिने संबंधित पब्लिकेशनला यापुढे तिचे रिव्ह्यू न लिहिण्याची विनंती केली.
‘फिल्म कम्पॅनियन’ने लिहिलेल्या रिव्ह्यूवर यामीने संतप्त प्रतिक्रिया दिली. या रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट तिने ट्विटरवर शेअर केला. ‘यामी गौतम आता हिंदी चित्रपटातील मृत गर्लफ्रेंड राहिलेली नाही, परंतु तिचं संघर्षपूर्ण हास्य सतत रिपिट होऊ लागलंय’, असं त्यात लिहिण्यात आलंय. यावर प्रतिक्रिया देताना यामीने लिहिलं, ‘मी आणखी काही बोलण्यापूर्वी, मला हे स्पष्ट करायचं आहे की मी सहसा टीकेत काही तथ्य असेल तर ते मान्य करते. पण जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला त्याबद्दल बोलणं आवश्यक वाटतं. माझ्या अलीकडील चित्रपट आणि परफॉर्मन्सेसमध्ये अ थर्स्ट डे, बाला, उरी इत्यादींचा समावेश आहे आणि तरीही हा माझ्या कामाचं रिव्ह्यू समजला जातो. हे अत्यंत अपमानास्पद आहे.’
Before I say anything else, I’d like to say that I usually take constructive criticism in my stride. But when a certain platform keeps trying to pull you down consistently, I felt it necessary to speak up about it. https://t.co/GGczNekBhP pic.twitter.com/wdBYXyv47V
— Yami Gautam Dhar (@yamigautam) April 7, 2022
‘प्रत्येक संधीनुसार आपली क्षमता पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहण्यासाठी कोणासाठीही आणि विशेषत: माझ्यासारख्या सेल्फमेड अभिनेत्रीसाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र काही नामांकित पोर्टल्समधून हे असं वाचायला मिळतं. हे मन दुखावणारं आहे कारण इतर बऱ्याच जणांप्रमाणे मीसुद्धा फिल्म कम्पॅनियनला वाचायचे, पहायचे. परंतु आता यापुढे ते मी करेन असं मला वाटत नाही. मी तुम्हाला विनंती करते की यापुढे माझ्या कामाचा रिव्ह्यू लिहू नका. ते माझ्यासाठी कमी वेदनादायक असेल’, असं तिने पुढे लिहिलं.
My recent films & performances include ‘A Thursday’, ‘Bala’, ‘Uri’ etc & yet this is qualified as a ‘review’ of my work! It’s extremely disrespectful!
— Yami Gautam Dhar (@yamigautam) April 7, 2022
It takes years of hard work for anyone & especially a self-made actor like me to keep proving our mettle again & again with every opportunity. This is what it comes down to from certain reputed portals!
— Yami Gautam Dhar (@yamigautam) April 7, 2022
It’s heartbreaking since I did look up to @FilmCompanion once upon a time, like many of us, but I don’t seek that since long now! I would request you not to ‘review’ my performance henceforth ! I’ll find grace in that & it’ll be less painful.
— Yami Gautam Dhar (@yamigautam) April 7, 2022
दसवी या चित्रपटात अभिषेक बच्चन राजकारणी गंगाराम चौधरीच्या भूमिकेत आहे. ज्याला काही कारणास्तव तुरुंगात जावं लागतं. यामध्ये यामी ज्योती देस्वाल या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतेय. नवीन अधीक्षक म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली असते आणि गंगाराम चौधरीला ती दहावीची परीक्षा पास करण्यास प्रवृत्त करते. निम्रत कौरने या चित्रपटात गंगाराम चौधरी यांची पत्नी बिमला देवीची भूमिका साकारली आहे. पती तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रीपद तिच्याकडे येतं.
हेही वाचा:
Mulgi Zali Ho: ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार का? वाहिनीने सांगितलं सत्य
Maha Minister: 11 लाखांच्या पैठणीवरून वाद; आदेश बांदेकरांना नेटकरी म्हणाले, “ही साडी नेसून..”