मुंबई : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री यामी गौतम (Yemi Gautam) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. यामीनं उरी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्याशी लग्न केलं आहे. शुक्रवारी यामीनं लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हिमाचल प्रदेशात यामी आणि आदित्यचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. आता यामीच्या लग्नातील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
यामी आणि आदित्यनं कुटुंबाच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर यामीचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता यामीनं चाहत्यांसाठी आणखी काही फोटो शेअर केले आहेत, हे खूपच गोंडस आहे.
यामीनं शेअर केले खास फोटो
यामीने तीन वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोत तिला हळद लावण्यात येतेय. या फोटोमध्ये यामीच्या चेहऱ्यावर हळद लावली जात आहे आणि ती हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिनं लाल साडी सोबत पहाडी नथ परिधान करुन दितेय, सोबतच ती या फोटोमध्ये तिचा छल्ला दाखवतेय.
पाहा फोटो
तर तिसर्या फोटोमध्ये ती आपले पाय दाखवतेय. या फोटोत तिच्या पायात पैंजण आणि जोडवे दिसत आहे. सोबतच तिच्या पायावर मेंहंदी देखील दिसत आहे. हे सर्व फोटो शेअर करत यामीनं कॅप्शनमध्ये पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजी दिला आहे. चाहत्यांमध्ये तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
लग्नझाल्यापासून यामी सोशल मीडिया चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत आहे. असं म्हटलं जातं की यामी आणि आदित्यच्या लग्नात केवळ 18 जण उपस्थित होते. यामी गौतम हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील आहे. त्याचबरोबर आदित्यनं उरीच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. यामी या सिनेमात एका विशेष भूमिकेत दिसली होती, मात्र चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की या दोघांचं नातं कधी आणि कसं सुरू झालं.
संबंधित बातम्या
Yami Gautam : लग्नानंतर यामी गौतमचा पहिला फोटो आला समोर, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर
OTT Movies : जूनमध्ये ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित