Year Ender 2024: अभिनेता सलमान खान खान आणि अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण 2024 मध्ये सलमान आणि शाहरुख यांच्यासाठी अनेकांनी चिंता व्यक्त केली. कारण दोघांना अनेकदा जीवेमारण्याची धमक्या देण्यात आल्या. विशेषतः सलमान खान हा गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या निशाण्यावर आहे. ई-मेलच्या माध्यामातून अनेकदा सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. एवंढच नाही तर, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आला.
सांगायचं झालं तर, एप्रिल महिन्यात सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर चार राऊंड फायरिंग करण्यात आली. सकाळी जवळपास 5 च्या सुमारास भाईजानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत आरोपींना अटक केली. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची जबाबदार गुंड लॉरेन्स बिष्णोई याने स्वीकारली. लॉरेन्सने सलमान खानच्या हत्येसाठी 6 गुंडांना 20 लाख रुपये दिल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान समोर आली.
एवढंच नाही तर, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी बाबा सिद्दीकी यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सांगायचं झालं तर, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. शिवाय सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी देखील लॉरेन्स बिष्णोई याने स्वीकारली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. ‘जो कोणी सलमान खान याची मदत करेल त्याने स्वतःचा हिशेब करून ठेवावा…’ असं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कनेक्शन सलमान खान सोबत देखील जोडण्यात आला.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी आणि सलमान खान यांना अनेकदा जीवेमारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. शिवाय खंडणीची देखील मागणी करण्यात आली. खंडणीसाठी फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी उत्तर प्रदेश येथूल अटक केली.
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला धमक्या येत आहेत. त्याच्यावर काळवीट मारल्याचा आरोप आहे. बिश्नोई समाजात काळ्या हरणाची पूजा केली जाते आणि याच कारणामुळे बिश्नोई समाज सलमान खानवर नाराज आहे. सलमान खान याने माफी मागवी अशी बिष्णोई समाजाची इच्छा आहे. तर सलमानने चूक केली नाही तर, तो माफी का मागेल… असं वक्तव्य सलीम खान यांनी केलं.
यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहरुख खान याला देखील जीवेमारण्याची धमकी मिळाली. फैजान नावाच्या एका व्यक्तीने शाहरुख खान याला जीवेमारण्याची धमकी दिला. पोलिसांनी आरोपीला रायपूर येथून अटक केली. आरोपीने किंग खानकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. ’50 लाख रुपये दिले नाही तर, शाहरुख खान याला मारुन टाकेल…’ अशी धमकी आरोपीने दिली होती. मिळालेल्या धमकीनंतर शाहरुख याच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली.