‘ये जवानी है दीवानी’ फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; फोटो पोस्ट करत दिली गुडन्यूज

| Updated on: Jan 17, 2023 | 2:10 PM

आलिया भट्ट्, बिपाशा बासू यांच्यानंतर 'ये जवानी है दीवानी' फेम अभिनेत्री चाहत्यांना देणार आनंदाची बातमी; खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

ये जवानी है दीवानी फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; फोटो पोस्ट करत दिली गुडन्यूज
'ये जवानी है दीवानी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; फोटो पोस्ट करत दिली गुडन्यूज
Follow us on

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री बिपाशा बासू यांच्या चिमुकल्यांनी गेल्या वर्षी जगात पाऊल ठेवलं. आलिया आणि बिपाशा दोघींशिवाय अनेक टीव्ही अभिनेत्रींनी देखील त्यांच्या चिमुकल्यांचं जगात स्वागत केलं. आता या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव सामिल होणार आहे. सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीने फार कमी भूमिका साकारल्या पण चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान भक्कम केलं.

‘यारियां’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री जर्मन मॉडेल एवलिन शर्मा लवकरच आई होणार आहे. एवलिन शर्मा हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टमध्ये एवलिन शर्मा हिने स्वतःचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

 

 

एवलिन शर्मा हिने आई होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र एवलिन शर्मा तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.

एवलिन शर्मा हिने २०२१ मध्ये तुषान भिंडी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यातच एवलिन शर्मा हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. नोव्हेंबर २०२१ मध्ये एवलिन शर्मा हिने गोंडस मुलीला जन्म दिला. आता एवलिन शर्मा दुसऱ्यांदा आई होणार आहे.

एवलिन शर्मा सध्या बॉलिवूड पासून दूर असली, तरी सोशल मीडियावर मात्र कामय चर्चेत असते. एवलिन शर्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. एवलिन शर्मा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.