‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत अभिनेत्री हिना खान म्हणजे अक्षरा हिच्या सासूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली वर्मा तुम्हाला आठवत असेलच. मालिकेमुळे सोनाली हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली होती. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर देखील सोनाली हिच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. पण आता सोनाली वर्मा परदेशात वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली वर्मा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीने पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण करणार का? यावर देखील अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेत गेली होती. अमेरिकेत गेल्यानंतर आपण आपल्या देशापासून लांब होत आहोत… अशी भावना अभिनेत्रीच्या मनात होती.
जवळपास 5 वर्ष मालिकेत काम केल्यानंतर अभिनेत्रीचं लग्न ठरलं. त्यामुळे छोट्या पडद्याचा निरोप घेत अभिनेत्री लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली हिने कुटुंब आणि बेबी प्लानिंगचा देखील विचार केला. सोनाली हिने 2013 मध्ये अमेरिकेतील एनआरआय सचिन सचदेवा यांच्यासोबत लग्न केलं आणि अमेरिकेत गेली.
अभिनेत्री सोनाली वर्मा म्हणाली, ‘टीव्ही इंडस्ट्री, मित्र, कुटुंब आणि सर्व आयुष्य सोडून मी परदेशात आली. माझ्या मनात एकच भावना होती ती म्हणजे, मी अमेरिका नाहीतर, दुसऱ्या शहरात आहे. त्यामुळे मी इतकी वर्ष परदेशात राहू शकली. 2003 मध्ये मी टीव्ही विश्वात पदार्पण केलं.’
‘तीन मालिकांमध्ये मी काम केलं. पण मला ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मालिकेतून ओळख मिळाली. आता मला ऑफर्स येत नाहीत आणि मला कमबॅक देखील करायचं नाही… कारण माझा लहान मुलगा आहे. माझ्यासाठी त्याचा सांभाळ करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सोनाली वर्मा आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर सोनाली हिने 11.7 K फॉलोअर्स आहेत.