‘स्त्री कमी तू तर पुरुषच दिसतेस…’, नेटकऱ्यांच्या कमेंटवर भडकली ‘ही’ अभिनेत्री; तिच्या स्टाईवर चाहते फिदा

| Updated on: Jul 25, 2023 | 10:38 AM

पतीसोबत रोमाँटिक फोटो पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री ट्रोल, एक नेटकरी म्हणाला 'एका फ्रेममध्ये दोन पुरुष', तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'दोन हँडसम पुरुष...', 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण?

स्त्री कमी तू तर पुरुषच दिसतेस..., नेटकऱ्यांच्या कमेंटवर भडकली ही अभिनेत्री; तिच्या स्टाईवर चाहते फिदा
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मालिका, सिनेमे, अनेक शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत अभिनेत्री स्वतःची ओळख निर्माण करतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड मोठी असते. एवढंच नाही अनेक लोकं अभिनेत्रींना त्यांच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्समुळे अधिक फॉलो करतात. अभिनेत्रींना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी असतेच, पण त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री चर्चेत येतात. एवढंच नाही नेटकरी कमेंटमध्ये स्वतःची प्रतिक्रिया देत अभिनेत्रींना ट्रोल देखील करत असतात. सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर अभिनेत्री अर्चना पूरन सिंग आहे. एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे अर्चना हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अर्चना पूरन सिंग इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमुळे अर्चना कायम गेस्ट म्हणून दिसते. एवढंच नाही तर, अर्चना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री कधी पती परमीत सेठी, मुलं तर कधी घरात काम करणाऱ्या भाग्यश्री यांच्यासोबत देखील सोशल मीडियावर फनी व्हिडीओ शेअर करत असते.

हे सुद्धा वाचा

 

 

चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. नुकताच अभिनेत्रीने पतीसोबत एक जुना फोटो शेअर केला. पण पतीसोबत जुना फोटो शेअर करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. अशात भडकलेल्या अर्चना हिने देखील नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

पतीसोबत जुना फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘काही मिनिटांपूर्वी.. गुगल मला आठवण करुन देत होता की, आयुष्य किती अद्भुत आहे…’ तिच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला, तर दुसरीकडे अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं आहे.

एक नेटकरी अर्चनाच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘एका फ्रेममध्ये दोन पुरुष’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोन हँडसम पुरुष…’, एवढंच नाही तर, ‘स्त्री कमी तू तर पुरुषच दिसतेस…’ असं देखील नेटकरी अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करत म्हणाले.

नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकलेल्या अर्चना हिने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘किती वाईट विचार ठेवता.. थोडं शिक्षण घेतलं असतं तर, कळलं असतं मोठ्यांसोबत कसं राहायचं असतं. प्रत्येक वयोगटातील, कोणत्याही आकाराच्या स्त्रियांचा आदर करा. जेव्हा स्त्रिया स्वतःच एकमेकांचा आदर करू शकत नाहीत तेव्हा तुम्ही पुरुषाकडून आदराची अपेक्षा कशी करू शकता?’ असा प्रश्न देखील अभिनेत्रीने यावेळी उपस्थित केला. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.