बॉलीवूडमधील (Bollywood)तरुण कलाकार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची कला दाखवत आहेत. पण असे अनेक दिग्गज कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे रसिकांचे मनोरंजन करत आहेत. एवढेच नाही तर आज वयाने मोठे असूनही ते आपल्या अभिनयाने तरुण कलाकारांना टक्कर देताना दिसतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर ते तगडे मानधन(Remuneration) आकारताना दिसतात. त्यांच्या चित्रपटासाठी(Film) त्यांच्या फीची मागणी आजही जास्त आहे. या यादीत अमिताभ बच्चनपासून ते धर्मेंद्र, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांचा समावेश आहे.
बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही भरपूर काम करतात. चित्रपटांव्यतिरिक्त तो एकामागून एक टीव्ही शो देखील करतात. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी 10 कोटी मानधन घेतले आहे .
अनिल कपूर हा बॉलिवूडचा झक्कास अभिनेता आहे. अनिल आपल्या फिटनेसने तरुण कलाकारांच्या सोबत स्पर्धा करताना दिसतो. अनिल कपूरने जुग जुग जिओ या चित्रपटासाठी २ कोटी इतके रुपये घेतले होते.
बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी यावर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट द काश्मीर फाइल्स दिला.मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी अनुपमने एक कोटी रुपये घेतले होते.
रत्ना पाठक शाह ही टीव्ही आणि बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. रत्ना नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकते. शेवटच्या जयशभाई जोरदार या चित्रपटात रत्नाने त्याच्या दमदार अभिनयासाठी एक कोटी रुपये घेतले होते.
कॉमेडी असो वा खलनायक, बोमन प्रत्येक व्यक्तिरेखा चोख बजावतो. जयशभाई जोरदार या चित्रपटासाठी बोमनने २ कोटी घेतले होते.
बऱ्याच वर्षांनंतर नीतू ‘जुग-जुग जियो’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून परतली आणि तिच्या पुनरागमनाने नीतूने सर्वांची मनं जिंकली. या चित्रपटात नीतूने 1.25 कोटी घेतले होते.
धर्मेंद्र आता करण जोहर दिग्दर्शित रॉकी आणि राणीची प्रेमकथा या चित्रपटात दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्रने या चित्रपटासाठी 5 कोटी रुपये घेतले आहेत