बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटामुळेही चर्चेत दिसतंय. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर कायमच शिखर पहाडिया याच्यासोबत स्पॉट होताना दिसते. जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसत आहे. प्रमोशनवेळी तिने काही मोठे खुलासे देखील केले.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर हिचा मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची तशी चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटात जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत आहे.
आता चक्क सोलापुरातील जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी 3 दिवसाचे 18 शो बुक केले आहेत. सोलापुरातील नागरिकांना 3 दिवस आता मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. जान्हवी कपूरच्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटासाठी 6 लाख रुपये खर्च करत 18 शो चाहत्याने चक्क बुक केले आहेत.
सोलापुरातील धर्मराज गुंडे, तन्वीर शेख या चाहत्यांनी जान्हवी कपूरसाठी हे शो बुक केले आहेत. सोलापुरातील ई स्क्वेअर टॉकीजमध्ये नागरिकांना 3 दिवस जान्हवीचा चित्रपट फ्रीमध्ये आता बघायला मिळणार आहे. आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी चाहते काय करू शकतात, याचेच हे उदाहरण आहे.
काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात जान्हवी कपूर हिच्यासोबत वरून धवन हा मुख्य भूमिकेत दिसला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. जान्हवी कपूर ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. एका चित्रपटासाठी जान्हवी कपूर चांगली फीस देखील घेते.