‘ते’ प्रकरण एल्विश यादव याच्या अंगलट, पोलिसांकडून अटक, युट्युबरच्या अडचणीत मोठी वाढ, वाचा काय प्रकरण?

| Updated on: Mar 17, 2024 | 8:00 PM

Elvish Yadav Arrested : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याला नुकताच पोलिसांनी अटक केलीये.

ते प्रकरण एल्विश यादव याच्या अंगलट, पोलिसांकडून अटक, युट्युबरच्या अडचणीत मोठी वाढ, वाचा काय प्रकरण?
Follow us on

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याये बघायला मिळाले. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप हे करण्यात आले. आता हेच नाही तर एल्विश यादव याला नुकताच पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. रेव्ह पार्टी प्रकरण एल्विश यादव याच्या चांगलेच अंगलट आल्याचे देखील बघायला मिळतंय. यापूर्वी पोलिसांकडून या प्रकरणात एल्विश यादव याची अनेकदा चाैकशी ही करण्यात आली. आता पोलिसांकडून थेट एल्विश यादव याचा अटक करण्यात आलीये.

एल्विश यादव याला पोलिसांकडून चाैकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. नोएडा पोलिसांकडून एल्विश यादवला अटक करण्यात आलीये. रेव्ह पार्टी प्रकरणातच एल्विश यादव याला अटक केल्याचे स्पष्ट आहे. आता एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.

नोएडा पोलिसांनी सेक्टर 39 मध्ये एफआयआर एल्विश यादवच्या विरोधात नोंदवली होती. आज त्याला चाैकशीसाठी बोलवण्यात आले आणि अटकही करण्यात आली. अवघ्या काही वेळातच एल्विश यादव याला कोर्टात हजर केले जाणार आहे. एल्विशवर रेव्ह पार्ट्याचे आयोजन केल्याचा आरोप असून या पार्टीतून सापांचे विष दिले जाते.

एल्विश यादवने आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये एकून नऊ साप हे जप्त करण्यात आले. त्यापैकी चार साप हे बिनविषारी होते तर पाच नागांच्या विष ग्रंथी काढून घेण्यात आल्या. या छाप्यादरम्यान नऊ विषारी साप जप्त करण्यात आले. कोबरा सापाचा देखील यामध्ये समावेश होता, सापाच्या विषाची नशा एल्विश यादवच्या पार्टीत केली जात होती.

काही तास चाैकशी केल्यानंतर पोलिसांनी एल्विश यादव याला अटक केली. यापूर्वीही अनेकदा एल्विश यादवने सापांच्या विषाच्या पार्टीचे आयोजन केल्याचे सांगितले जाते. आता हेच प्रकरण चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याचे काही दिवसांपूर्वीच सापांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.