प्रसिद्ध युट्यूबर अर्थात अरमान मलिक हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. अरमान मलिक याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. अरमान मलिक याच्यावर नेहमीच सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसते. अरमान मलिक याने पत्नीच्या मैत्रिणीसोबतच लग्न केले. अरमानच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. दोघींचे मिळून चार लेकरं आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा जोरदार रंगताना दिसतंय की, अरमान मलिक हा आता तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर नेहमीच अरमान मलिक याने भाष्य करणे टाळले आहे. आता पहिल्यांदाच आपल्या तिसऱ्या लग्नाबद्दल बोलताना अरमान मलिक हा दिसला आहे. विशेष म्हणजे यावेळी जरा स्पष्ट अरमान मलिक हा बोलला आहे.
युट्यूबर पुनीत सुपरस्टारने अरमान मलिक याला विचारले की, तुम्ही तिसरे लग्न करणार आहात. यावर अरमान मलिक हा म्हणाला की, माझ्या दोन्ही पत्नी उशीने माझे तोंड दाबतील. एकजण पाय पकडेल आणि दोन तीस तासांमध्ये माझा विषयच संपवतील. यामुळे मी असे काही करण्याचा साधा विचार देखील करू शकत नाही.
म्हणजेच काय तर आता अरमान मलिक यानेच स्वत: स्पष्ट केले की, तिसरे लग्न करण्याच्या तो कोणत्याही विचारात नाहीये आणि तो आपल्या कुटुंबासोबत खुश आहे. तिसऱ्या लग्नाबद्दल ज्याकाही गोष्टी सुरू आहेत, त्या फक्त आणि फक्त अफवाच आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, अरमान मलिकचे दोन लग्न झालेले असतानाही त्याचे एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे.
अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिला एक मुलगा आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्वजण एकाच घरात राहतात आणि अत्यंत चांगले रिलेशन आहेत. कृतिका मलिक आणि पायल या बहिणींसारख्या राहतात. या दोघी देखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय नेहमीच दिसतात.