करोडपती युट्युबर अरमान मलिक पाचव्यांदा बनणार बाप, पायल आणि कृतिका दोन्ही पत्नी प्रेग्नंसीसाठी…

| Updated on: Sep 26, 2024 | 3:41 PM

अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाल्या होत्या. धमाकेदार गेम खेळताना अरमान मलिकची दुसरी पत्नी दिसली.

करोडपती युट्युबर अरमान मलिक पाचव्यांदा बनणार बाप, पायल आणि कृतिका दोन्ही पत्नी प्रेग्नंसीसाठी...
Armaan Malik
Follow us on

युट्युबर अरमान मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा थेट बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला. अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर निर्मात्यांवर जोरदार टीका करण्यात आली. अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक असून तिला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. अरमानच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक असून तिला एक मुलगा आहे. अरमानने पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच कृतिका हिच्यासोबत लग्न केले.

विशेष बाब म्हणजे दोघीही एकाच घरात संपूर्ण कुटुंबासोबत राहतात. ज्यावेळी पायल मलिक ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली, त्यावेळी कृतिकाचा मुलगा आणि बाकी घराची जबाबदारी पायल हिनेच घेतली होती. हेच नाही तर मलिक कुटुंबिय लवकरच मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी करणार असल्याचेही सांगितले जातंय. अत्यंत मोठ्या संपत्तीचे हे तिघे मालक आहेत.

एका मुलाखतीमध्ये अरमान मलिक याने सांगितले होते की, 200 कोटी संपत्तीचा तो मालक आहे. चार मुले असतानाच आता पाचव्या लेकराचे देखील आगमन लवकरच मलिक कुटुंबामध्ये आता होणार आहे. नुकताच पायल मलिक ही कृतिकाला म्हणते की, आता जैद दोन वर्षांचा होतोय तू लगेचच दुसऱ्या बाळाचे प्लनिंग कर. आपले चार बाळ आहेत अजून एक करायला काहीच हरकत नाही.

तू दुसरे बाळ कर असेच थेट पायल कृतिकाला म्हणते. कृतिका ही पायल हिच्यासमोर मोठी अट ठेवते. कृतिका मलिक म्हणते की, मी एकटी बाळाला जन्म देणार नाहीये…माझ्यासोबत तू पण करायचे बेबी प्लॅनिंग. तू चाैथे बाळ कर मग मी करते. यावर थेट होकार देताना पायल मलिक ही दिसत आहे. पायल म्हणते की, मला IVF करावे लागेल. मला काही टेन्शन नाहीये मी परत वजन कमी करेल.

कृतिका मलिक ही थेट पुढच्या वर्षीच बाळाचे प्लॅनिंग करणार असल्याचे म्हणताना दिसत आहे. म्हणजेच काय तर आता लवकरच परत एकदा मलिक कुटुंबामध्ये बाळाचे आगमन होणार आहे. कृतिका मलिक आणि पायल मलिक सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अनेकजण दोन लग्न केल्यामुळे अरमान मलिक याच्यावर टीका करताना दिसतात.