भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल त्याच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तो आर जे महावशसोबत दिसल्यापासून त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. या सगळ्यामुळे आर जे महावश प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आता तिने खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर जे महावशने तिच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केले आहे. तिने स्पष्ट सांगितले की ती कोणासोबतही रिलेशनशीपमध्ये नाही. 'मला लग्न करायचे असेल तर मी एखाद्याला डेट करेन. मला मुळात लग्नाची भीती वाटते. मी १९ वर्षांची असताना माझा साखरपुडा झाला होता' असे ती म्हणाली होती.
पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडने महावशची एकदा नव्हे तर तीनदा फसवणूक केली होती. त्यानंतर तिने साखरपुडा मोडला. या सगळ्यामुळे तिला पॅनिक अटॅक येऊ लागले होते.
डॉक्टर तिच्या आई-वडिलांना तिला काय झाले हे विचारायचे पण ती त्यांच्याशी शेअर करु शकली नाही. कारण तिला त्या मुलाशी लग्न करायचे होते.
पण नंतर महावशने साखरपुडा मोडला. सतत येणाऱ्या गंभीर पॅनीक अटॅकवर तिने उपाचर घ्यायला सुरुवात केली. इंजेक्शन्सही घेतले.