पहिल्यांदाच लग्नाबद्दल झहीर इक्बाल याने केला मोठा खुलासा, म्हणाला, सोनाक्षी सिन्हा आणि माझ्यामध्ये 50 हजार…

| Updated on: Jul 19, 2024 | 3:41 PM

सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. पहिल्यांदाच आता सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल बोलताना झहीर इक्बाल हा दिसलाय. यावेळी त्याने काही मोठे खुलासे देखील केले आहेत.

पहिल्यांदाच लग्नाबद्दल झहीर इक्बाल याने केला मोठा खुलासा, म्हणाला, सोनाक्षी सिन्हा आणि माझ्यामध्ये 50 हजार...
sonakshi sinha
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आपल्याच लग्नात सोनाक्षी सिन्हा ही धमाल करताना दिसली. झहीर इक्बाल याच्यासोबत तिने धमाकेदार असा डान्स देखील केला. सात वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचे सांगितले गेले. मात्र, लग्नामध्ये सही करताना सोनाक्षी सिन्हा हिच्या बाजूला तिचे आई वडील हे उपस्थित होते.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या हनिमूनचे फोटोही व्हायरल होताना दिसले. नुकताच झहीर इक्बाल याने लग्नानंतर मोठा खुलासा केलाय. झहीर इक्बाल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्याने मोठे खुलासे केले. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे खुश असल्याचेही बघायला मिळतंय.

झहीर इक्बाल याने म्हटले की, माझ्यामध्ये आणि सोनाक्षी सिन्हामध्ये 50 हजार मतभेद होतील. पण आमच्यात कधीही धर्म येणार नाही. सलीम अंकलने एकदा मला सांगितले होते की, त्यांनी ही सलमा अँटीच्या परिवाराला हेच सांगितले होते. पुढे झहीर म्हणाला की, मी आणि सोनाक्षीने सात वर्ष एकमेकांना डेट केले.

कधीही आम्ही धर्मावर भाष्य केले नाही आणि आमच्यात कधी त्याबद्दल चर्चाही झाली नाही. झहीर म्हणाला, आम्ही दोघेही एकमेकांच्या धर्माचा खूप जास्त आदर करतो. आवाज फक्त बाहेरवाल्यांचा आहे. त्यांना कसे चूप करायचे हे आम्ही शिकलो आहोत. आता या गोष्टींचा आमच्यावर अजिबातच परिणाम होत नाही.

लग्नानंतर पहिल्यांदाच यावर भाष्य करताना झहीर इक्बाल हा दिसला आहे. झहीर इक्बाल हा नेहमीच सोनाक्षी सिन्हा हिला सपोर्ट करताना दिसतो. झहीर इक्बाल यानेही बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सलमान खान याने झहीरला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. झहीर इक्बाल आणि सलमान खानच्या वडिलांमध्ये खूप जास्त चांगली मैत्री आहे.