अन् झहीरने सोनाक्षीला अचानक दिला धक्का..; वैतागून अभिनेत्री म्हणाली ‘हा मुलगा शांतीने..’

| Updated on: Dec 23, 2024 | 12:53 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झहीर सोनाक्षीला समुद्राच्या पाण्यात जोरात ढकलताना दिसून येत आहे.

अन् झहीरने सोनाक्षीला अचानक दिला धक्का..; वैतागून अभिनेत्री म्हणाली हा मुलगा शांतीने..
Sonakshi Sinha
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. अशातच ‘केबीसी’मध्ये रामायणाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी तिच्यावर वारंवार टीका केली. या टीकेनंतर कवी कुमार विश्वास यांनीसुद्धा शत्रुघ्न आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीवरील पोस्टद्वारे मुकेश खन्ना यांचा तर सडेतोड उत्तर दिलंय. त्याचसोबत कोणत्याही टीकेला न जुमानता सोशल मीडियावर ती तिच्या पतीसोबतच विविध फोटो आणि व्हिडीओ सतत पोस्ट करतेय. नुकताच तिने पती झहीरसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि झहीर समुद्रकिनारी मजामस्ती करताना दिसत आहेत. समुद्राच्या पाण्यात चालतानाचा व्हिडीओ सोनाक्षीला काढायचा असतो, म्हणून ती कॅमेरा सुरू करून पुढे चालत जाते. त्याचवेळी झहीर तिच्यासोबत प्रँक करतो. तो हळूच सोनाक्षीच्या मागे जाऊन तिला समुद्राच्या पाण्यात ढकलतो. आपल्याच धुंदीत असलेल्या सोनाक्षीला याची पुसटशीही कल्पना नसते आणि ती समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे भिजते. लाटांमुळे तिला त्या पाण्यातून सहज उभं राहताही येत नाही. झहीर या सर्व गोष्टींची मजा घेत असतो. सोनाक्षीच्या नाकातोंडात पाणी जातं आणि उठण्याचा प्रयत्न करत असतानाही पुन्हा एका लाटेने ती खाली पडते. हे पाहून झहीर आणखी जोरजोरात हसू लागतो. अखेर सोनाक्षी उठून झहीरला मागे धावते. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिलंय ‘शांतीने एक व्हिडीओसुद्धा बनवू देत नाही हा मुलगा..’ यासोबतच तिने रागाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

सोनाक्षी आणि झहीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आयुष्याचा आनंद तर हे दोघंच घेतायत’, असं एकाने लिहिलंय, तर ‘समुद्राच्या लाटासुद्धा झहीरच्या बाजूने आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नगाठ बांधली. यावर्षी जून महिन्यात मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी नोंदणी पद्धतीने आंतरधर्मीय विवाह केला.