झगमगत्या विश्वात प्रत्येकाच्या संघर्षाची कहाणी वेगळी आहे. पण आता सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेता सलमान खान याच्या ‘वीर’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री झरीन खान आहे. झरीन हिने फार कमी वयात कॉल सेंटरमध्ये काम करायाला सुरुवात केली होती. एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. लहानपणी वडीलांनी साथ सोडल्यानंतर झरीन हिच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. आई आणि बहिणीची भूक भागवण्यासाठी अभिनेत्रीने कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
झरीन मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीत कॉल सेंटरमध्ये काम करत होती आणि यासोबतच अभिनेत्री शिक्षण देखील घेत होती. झरीन खानला एक बहीण देखील आहे. कॉल सेंटरमध्ये काम करण्यासोबतच तिने अनेक ब्रँड्सच्या मॉडेल्सची जाहिरातही केली.
दरम्यान, झरीन 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘युवराज’ सिनेमाचा सेट पाहण्यासाठी गेली होती. सिनेमाच्या सेटवर सलमान खान याने पहिल्यांना झरीन याला पाहिलं आणि अभिनेत्रीचं नशीब चमकलं. सलमान खान याने ‘वीर’ सिनेमासाठी झरीन हिला कास्ट केलं. पण पुढचा प्रवास अभिनेत्रीसाठी फार कठीण होता.
‘अक्सर 2’ सिनेमाच्या निर्मात्यांसोबत झरीन हिचे वाद झाले होते. कारण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान निर्मात्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, ‘सिनेमाची शुटिंग सुरु झाली तेव्हा गरज नसताना मी छोटे कपडे घालावे अशी निर्मात्यांची इच्छा होती. ज्यामुळे त्यांच्यासोबत अनेक वाद झाले. अशात मी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या कपड्यांमध्ये रोज बदल व्हायचे…’
‘निर्माते त्यांची मर्यादा ओलांडत होते. कारण नसताना सिनेमातील किसिंग सीन वाढवण्यात आले. मला सिनेमाला नकार द्यायचा नव्हता. पण काही सीनमुळे मी त्रासली होती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. ‘अक्सर 2’ सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं होतं. तर सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला होता.
झरीन हिने ‘अक्सर 2’, ‘हेट स्टोरी 4’, ‘1921’, ‘वजह तुम हो’, ‘हेट स्टोरी 3’, ‘हाउसफुल 3’ आणि ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण बॉलिवूडमध्ये अभिनेत्री फार काही खास करु शकली नाही. आज बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.