अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खाव यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये हृतिक – सुझान यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटनंतर हृतिकच्या आयुष्यात सबा आझाद हिची एन्ट्री झाली आहे. तर, सुझान खान देखील गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे. चौघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. हृतिक – सुझान यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहे. दोघांच्या घटस्फोटावर सुझानचा भाऊ जयाद खान याने पहिल्यांदा मौन सोडलं आहे.
हृतिक – सुझान यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण कुटुंबाने कायम दोघांना चांगल्या वाईट काळ्यात सांभाळून घेतलं. दोघांकडे एकतर तडजोड करत जगण्याचा किंवा आनंदाने जगण्याचा पर्याय होता आणि त्याने कायम आनंदी राहण्याचा पर्याय निवडला. असं वक्तव्य सुझान हिच्या भावाने केलं.
मुलाखतीत जायद खान म्हणाला, ‘मुंबई एक प्रचंड कठीण ठिकाण आहे. शहरात लग्न टिकवणं फार कठीण आहे. आम्ही एका मॉर्डन कुटुंबात राहतो. जर दोन व्यक्ती आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचं नाही. पण दोघांमध्ये अनेक गोष्टी सामान्य आहेत. अशा वेळी दोघांना देखील पाठिंब्याची गरज असते.’
‘आमच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती खुल्या विचारांची आहे. आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. मुलांना देखील कुटुंबाबद्दल सर्व गोष्टी माहिती आहेत. कितीही वाईट काळ असला तरी, आम्ही कधीच एकमेकांच्या बाजूने बोलत नाही किंवा कोणाच्या पाठी काही बोलत नाही. मी हृतिकच्या फार क्लोज आहे. हृतिकचं मन फार मोठं आहे. शिवाय त्याची पार्टनर सबा आझाद देखील चांगली आहे. अर्सनाल देखील एक चांगला व्यक्ती आहे….’ एवढंच नाही तर, अर्सनाल देखील चांगला आहे… असं वक्तव्य देखील जयाद याने केलं.
घटस्फोटानंतर हृतिक याने सबा आझाद हिचा हात धरला तर, सुझान खान हिने अर्सनाल गोनी याचा हात धरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृतिक आणि अर्सनाल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. नुकताच, मुलाचा जन्म देखील चौघांनी एकत्र साजरा केला.