जंगलातील वाडा, एक लहान मुलगी अन् साडी नेसलेली बाई; झी मराठीवर सुरू होणार नवीन हॉरर मालिका

| Updated on: Oct 28, 2024 | 1:44 PM

झी मराठी वाहिनी लवकरच नवीन मराठी हॉरर मालिका "तुला जपणार आहे" प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात एका आई आणि तिच्या मुलीची कहाणी असल्याचे दिसून येते. प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

जंगलातील वाडा, एक लहान मुलगी अन् साडी नेसलेली बाई; झी मराठीवर सुरू होणार नवीन हॉरर मालिका
Horror Series "Tula Jappanar Aahe
Follow us on
आहट, मानो या ना मानो, या एकेकाळच्या गाजलेल्या हॉरर हिंदी मालिका. आता तर आहट हे मराठीमधून प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. कारण हॉरर मालिका कोणाला बघायला नाही आवडतं. त्यात जर ती मराठी असेल तर मग बातच काही ओर असते. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘ती परत आलीये’ किंवा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकांना चाहत्यांकडून प्रेम मिळाल्यानंतर आता आणखी एक नवीन हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी झी मराठीकडून दिवाळी गिफ्टच असणार आहे.
झी मराठीवर झी मराठीवर नवी ‘हॉरर’ मालिका
झी मराठीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘तुला जपणार आहे’ असं या मालिकेचं नाव आहे. “दिसत नसली तरीही असणार आहे…तुला जपणार आहे” असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे.  झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमो पाहून नक्कीच या मालिकेच्या कथेचा अंदाज येतो. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अजून शिगेला पोहोचली आहे.

tula-japnar-ahe-horror-serial

मालिकेचा प्रोमो चर्चेत
प्रोमोमध्ये जंगलातील एका वाड्यात एक लहान मुलगी आणि एक साडी नेसलेली बाई दिसत आहे. एका आरश्यासमोर त्या दोघीही उभ असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे कदाचित ही एका आई आणि तिच्या लहान लेकीची गोष्ट असल्याचे लक्षात येते.  या मालिकेतील पात्र आणि या मालिकेची वेळ अजून गुलदस्त्यातच आहे. तसेच या नवीन मालिका येणार म्हटल्यावर सुरु असलेल्या मालिकांपैकी कोणती मालिका बंद होणार याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. तसेच या मालिकाचा प्रोमोसुद्दा बऱ्यापैकी चर्चेत आहे.  प्रोमोमध्ये असलेले म्युझिक आणि व्हिडीओमुळे या मालिकेबद्दल नवनवीन अंदाज बांधले जात आहेत.

प्रेक्षकांना मालिकेची उत्सुकता

सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अलिकडेच झी मराठी वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सुरू झाली. त्यानंतर ‘लक्ष्मी निवास’ ही नवी मालिकाही लवकरच सुरू होणार आहे. अशातच झी मराठीने चाहत्यांसाठी हे आणखी एक सरप्राइज आणलं आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अनेकांनी प्रोमोवर कमेंट करत मालिका पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.