मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेल्या अभिनेत्रींची चर्चा आजही सोशल मीडियावर तुफान रंगलेली असते. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, अभिनेत्री झीनत अमान. ७० आणि ८० च्या दशकात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत रुपरी पडदा गाजवलेल्या झीनत यांनी चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. अनेक वर्षांपासून झीनत बॉलिवूडपासून दूर आहेत. पण आजही त्यांनी कोणी विसरु शकलेलं नाही. आजही असंख्या तरुणी झीनत यांना फॉलो करतात. एवढंच नाही तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करु पाहण्याऱ्या अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी देखील झीनत आमन आहेत. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
१९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या The Evil Within सिनेमातून झीनत आमन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर झीनत आमन यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर झीनत आमन यांनी ‘हलचल’, ‘हरे राम हरे कृष्ण’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’ यांसारख्या अनेक सुपरहीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत असताना, ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमात त्यांनी साकारलेल्या ‘रुपा’ भूमिकेचं भरभरुन कौतुक झालं. झीनत यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. झीनत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
दरम्यान, ८ जून रोजी झीनत अमान यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमातील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये झिनत अमान जमिनीवर झोपल्या आहेत. फोटोमध्ये झिनत यांनी हिरव्या आणि लाल रंगाची बांधनी प्रिंटची साडी नेसली आहे. फोटोमध्ये झिनत अमान हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.
स्वतःचा फोटो शेअर करत ‘सत्यम शिवम सुंदरम’ फेम अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘हॉट, हॉट, हॉट… गरमीवर काही अशा प्रकारे मात केली पाहिजे… कोणता दुसरा पर्याय आहे?’ सध्या झिनत अमान यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटी दोखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
बॉलिवूडचा प्रसिद्ध मनीष मल्होत्रा, अभिनेत्री मृणाल ठाकूर, दिग्दर्शक करण जोहर यांनी देखील कमेंट करत फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. तर एक नेटकरी फोटोवर कमेंट करत ‘बॉलिवूडमध्ये आजही तुम्हाला कोणी हारवू शकत नाही…’ असं म्हणाला आहे. तर दुसरा नेटकऱ्यांने फोटोवर, ‘अप्रतिम सौंदर्य…’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त झीनत अमान यांच्या फोटोची चर्चा रंगत आहे.