झिशान सिद्दीकी यांचा प्रचार सलमान खान करणार?; झिशान यांच्याकडून मोठी अपडेट काय?

| Updated on: Oct 28, 2024 | 4:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी हे आज वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त केला असून सलमान खान यांच्या प्रचारातील सहभागासंबंधी सूचक विधान केले आहे. यावेळी झिशान यांनी वडिलांच्या आठवणी जागवल्या आणि विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले.

झिशान सिद्दीकी यांचा प्रचार सलमान खान करणार?; झिशान यांच्याकडून मोठी अपडेट काय?
Zeeshan Siddiqui
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दीकी हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. झिशान हे वांद्रे पूर्व येथून उमेदवारी अर्ज भरत आहेत. आपल्या उमेदवारीवर झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपणच निवडून येणार आहोत. वांद्रे पूर्वे येथील जनता माझ्यासोबत आहे, असा विश्वास झिशान यांनी व्यक्त केला. तसेच अभिनेता सलमान खान निवडणुकीत प्रचाराला येणार की नाही? याबाबतची मोठी अपडेटही झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे.

उमेदवारी अर्ज भरायला निघण्यापूर्वी झिशान सिद्दीकी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सलमान खानबाबतचं मोठं विधान केलं आहे. सलमान खान माझ्यासोबत प्रचारात येतील की नाही हा त्यांचा निर्णय आहे. पण काल माझं सलमान खान यांच्यासोबत बोलणं झालं आहे, असं सूचक विधान झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे. मात्र सलमान खानसोबत काय बोलणं झालं हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

वडील नसतील असं वाटलं नव्हतं

आज माझे वडील सोबत नसतील असं मला कधी वाटलं नव्हतं. पण वडिलांचे मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहील. छोटी पदयात्रा काढून अर्ज भरणार आहोत. आज मी अर्ज भरण्यासाठी जात आहे. माझं कुटुंब आणि मतदार माझ्यासोबत आहेत. आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. विरोधक त्यांची निवडणूक लढत आहे. मी माझी निवडणूक लढत आहे, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

Zeeshan Siddique Salman Khan

जनता माझ्यासोबत

यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे उमदेवार वरूण सरदेसाई यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांची निवडणूक लढत आहेत. मी माझी निवडणूक लढत आहे. आव्हानाचा विषयच येत नाही. माझ्यासोबत वांद्रे पूर्वची जनता आहे. माझ्या वाईट काळात अजितदादा, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मला साथ दिली. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तर ठाकरे गटाला जागा दिली नसती

2019 मध्ये मी जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हाही घड्याळ चिन्ह आमच्या सोबत होतं. आताही तेच चिन्ह सोबत आहे. फक्त पंजा सोबत नाही, असं सांगतानाच वांद्रे पूर्व काँग्रेसचा बालेकिल्ला असता तर काँग्रेसने त्यांची जागा ठाकरे गटाला दिली नसती, असा चिमटा त्यांनी काढला.