वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. सध्या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास वाढणे, डोळ्यांचे नुकसान होणे, त्वचेशी संबंधित समस्या असे अनेक परिणाम आरोग्यावर होत आहेत. तुम्हाला देखील या वायू प्रदूषणाचे परिणाम टाळायचे असतील तर काही निरोगी हर्बल चहा तुमच्या आहारात समाविष्ट करा. ज्यामुळे आरोग्यास बरेच फायदे देखील होतील.
त्याच बरोबर हेही जणू घेऊयात कि काही दिवसांपूर्वी दिल्लीत अनेक ठिकाणचा एक्यूआय 400 च्या पुढे गेला होता आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामावर दुर्लक्ष करून चालणार नाहीत. हवेत पसरणाऱ्या विषाचे कण शरीरात जातात आणि श्वसनाच्या समस्येला सर्वाधिक कारणीभूत ठरतात. ज्यांना आधीच दम्याचा त्रास आहे त्यांना आणखी या त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या, तुमच्या आहारात काही चहाचा समावेश करू शकता जो अँटीऑक्सिडेंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
आल्याचा चहा
आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाक घरामध्ये आलं सहज सापडतं. आलं असे एक घटक आहे जे बऱ्याच शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. आल्यामध्ये असलेले जिंजरॉल घटक श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. म्हणून तुम्ही नियमित आल्याचा चहाचे सेवन केल्यास फुफ्फुसांना श्वसनमार्गाची जळजळ दूर करण्यापासून मदत करतील तसेच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास उपयुक्त ठरेल.
जेष्ठमधाचा चहा
खोकला, घसा खवखवणे आणि ब्रोन्कियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी आयुर्वेदात जेष्ठमधाचा वापर केला जातो. यात दाहक आणि कफ कमी करणारे गुणधर्म असतात, त्यामुळे हिवाळ्यातील थंड तापमान टाळण्यासाठी आणि हवेत पसरलेल्या प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेष्ठमधापासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरेल.
निलगिरीचा चहा
नीलगिरीचा चहा वायू प्रदूषणाच्या आरोग्यावरील परिणामांशी लढण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. तसेच निलगिरी पासून बनवलेल्या या हर्बल चहाचे सेवन केल्यास तुम्हाला श्वसनाचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरेल. तसेच निलगिरीचे तेल श्वसनाच्या समस्येपासून मुक्त होण्यास देखील उपयुक्त असते. तुम्हाला जर ब्राँकायटिस आणि सर्दी असल्यास हा चहा देखील पिऊ शकतो.
पुदिना चहा
पुदीनाचा चहा केवळ श्वसनाच्या समस्या दूर करत नाही तर आपला मूड बूस्ट करण्यास देखील उपयुक्त आहे. पुदिन्याचा चहा प्यायल्याने फ्रेश वाटते. या चहामुळे वायुमार्गाच्या स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही.