भारतात आज मधुमेह (Diabetes) ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्याचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तज्ञांच्या मतानुसार, आपली सुस्त व आळशी जीवनशैली आणि अयोग्य आहार (Food Habits), हे मधुमेहींची संख्या वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. भारतात (India)मधुमेहाचे कोट्यवधी रुग्ण असून ही संख्या झपाट्याने वाढत आहे. फॉर युअर स्वीटहार्टनुसार, मधुमेह 2 प्रकारचे असतात. टाइप 1 मधुमेह हा कोणत्याही व्यक्तीला अनुवांशिकतेने होऊ शकतो. तर टाइप 2 मधुमेह हा, चुकीच्या सवयी, अयोग्य आहार आणि आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. टाइप 1 मधुमेहवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु टाइप 2 मधुमेह होणे टाळणे हे आपल्या हातात असते. कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी तो आजार का झाला, याचं कारण शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. हाच निकष मधुमेहाबाबातही लागू होतो. आपल्या जीवनशैलीत अशा अनेक सवयी आहेत, ज्यामुळे आपण या आजाराने ग्रासले जातो. तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल तर आजच या सवयी सोडा.
सकाळची हलकी न्याहरी किंवा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल, तर तुम्ही मधुमेहाचे शिकार होऊ शकता. कारण नाश्ता न केल्याने तुम्ही दिवसभर अती प्रमाणात कात रहाल. जर तुम्हाला नाश्ता करायला वेळ नसेल तर काही फळंही खाऊ शकता. मधुमेह टाळण्यासाठी, दिवसाची सुरूवात पौष्टिक आहाराने करणे चांगले ठरते.
बराच वेळ बसून काम केल्यानेही अनेकदा मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. कॉम्प्युटरवर काम करत बराच वेळ बसून राहणं, सोफ्यावर बसून काम करणं यामुळे तुमच्या आरोग्याचा धोका वाढतो. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसल्याने शरीरात टाइप 2 मधुमेहासह अनेक समस्या निर्माण होतात, असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. जर तुम्ही कोणतही बैठं काम करत असाल तर मध्ये-मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. याच कारणामुळे अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने (ADA) प्रत्येक व्यक्तीला, अगदी ज्यांना मधुमेह नाही त्यांनाही दर 30 जागेवरून उठण्याचा आणि काही हालचाली करण्याचा सल्ला दिला आहे.
रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. चांगल्या आरोग्यासाठी, रात्री चांगली झोप घेणे महत्वाचे आहे. मधुमेहाची समस्या बहुधा रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या लोकांमध्ये आढळते. उशिरा झोपल्याने शरीरातील मेटाबॉलिज्मवर (चयापचय क्रिया) परिणाम होतो. झोपेच्या अभावामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो. डायबेटोलोजिया मध्ये 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी सुमारे 900,000 लोकांच्या डीएनएचा अभ्यास केला असता, असे आढळले की, ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता 17 टक्के अधिक होती. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल संतुलन बिघडते.
हल्ली आपली जेवण्याची स्टाइल पूर्णपणे बदलली आहे. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक आजार हो्ऊ शकतात. एका अभ्यासानुसार, प्रक्रिया केलेले अन्न खाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो. लाल मांस खाणे, हेदेखील मधुमेहास देखील आमंत्रण देते, म्हणून आपण अशा पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे.
जर तुम्ही धूम्रपान (Smoking)करत असाल, तर अन्य लोकांच्या तुलनेत तुम्हाला मधुमेहाचा धोका अधिक आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (CDC)च्या मते धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता 30 ते 40 टक्के जास्त असते. धूम्रपान आणि मद्याचे सेवन यामुळे मधुमेहाव्यतिरिक्त, हृदयरोग आणि हाय कोलेस्ट्रॉल सारखे आजार देखील उद्भवतात. धूम्रपान केल्याने रक्तपेशींवर परिणाम होतो आणि यामुळे रक्तवाहिन्याही अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
मधुमेहाची समस्या टाळायची असेल तर गोड, साखरयुक्त गोष्टींपासून दूर राहावे लागते. मधुमेहासाठी साखर हा सर्वात घातक घटक आहे. मधुमेहाचा त्रास असेल तर कमी कार्ब्स असलेले साखर रहित पदार्थ खावेत. मधुमेहग्रस्त लोक डार्क चॉकलेट खाऊ शकतात कारण त्यात इतर चॉकलेटपेक्षा खूप कमी साखर असते.
पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते. सामान्यत: डॉक्टर्स 5-6 लीटर्स पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्यामुळे अनेक आजार दूर होतात. जे लोक कमी पाणी पितात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो, असे संशोधकांना आढळले आहे . यकृत आणि मूत्रपिंडात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ नसल्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्यास मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने भूक लागते आणि उशिरा जेवल्याने तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या जेवणानंतर, उशीरा कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. दररोज तिन्ही वेळा संतुलित, चौरस, पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि रात्री उशीरा काहीही खाणे टाळावे.