आपल्या अभिनय आणि सौंदर्यावर अधिराज्य गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने सध्या आरोग्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. ५५ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्री अनेकदा तिच्या सोशल मीडियावर निरोगी खाद्यपदार्थांबद्दल आणि आपण आपल्या आहारात काय समाविष्ट केले पाहिजे याबद्दल सांगत असते. शिंगाडे हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, प्रथिने, थायमिन आणि अनेक पोषक घटक असतात. अशा वेळी उकडलेले शिंगाडे खाणे खूप फायदेशीर ठरते. नुकतंच भाग्यश्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शिंगाड्याचे फायदे सांगितले आहेत. जाणून घेऊया
भाग्यश्रीने त्यांच्या इंस्टाग्रामवर शिंगाड्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांबद्दल सांगितले आहे. भाग्यश्री यांनी पोस्ट शेअर करताना सांगितले आहे की, “शिंगाड्यामध्ये कार्ब असूनही ते खूप पौष्टिक आहे. त्यांचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ कार्ब हळूहळू तुटतात, ज्यामुळे ग्लूकोज हळूहळू आपल्या रक्तात प्रवेश करते आणि आपले शरीर दीर्घकाळ उर्जावान ठेवते. याशिवाय याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. यात फायबर, पोटॅशियम, मॅंगनीज, कॉपर, बी 6, राइबोफ्लेविन आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात असतात.
शिंगाडे नीट धुवून त्यावरील साल काढून त्याचे सेवन करावे. शिवाय, तुम्ही या शिंगाड्याना पाण्यात उकडवून खाऊ शकता.
पाण्यात शिंगाडे उकडून खाल्याने त्यांचे पचन करणे देखील सोपे आहे.
यामुळे तुमची पचनक्रिया तर सुधारतेच, शिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
ते खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
शिंगाड्याची चव गोड आणि नटससारखी लागते. शिवाय या शिंगाड्याचा समावेश कोशिंबीर बनवण्यात देखील करू शकता.
खास करून तुम्ही जर काकडी, गाजर बारीक करून यांच्या सोबत देखील शिंगाडे बारीक करून सेवन करू शकतात.
भारतीय, चिनी, युरोपीय आणि आशियाई खाद्यपदार्थांमध्ये या शिंगाड्याचा वापर केला जातो. तर या देशातील लोकं जेवणाच्या चवीसाठी नूडल्स किंवा फ्राइड राईसमध्ये शिंगाड्याचे समावेश करून सेवन करतात.