बद्धकोष्ठतेची समस्या जाणवतेय, मग आहारात करा ‘ या ‘ पदार्थांचा समावेश

| Updated on: Sep 22, 2022 | 4:18 PM

बद्धकोष्ठतेची समस्या खूप त्रासदायक असते. त्यामुळे सूज येणे आणि ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे घरगुती उपायही करून पाहू शकता.

बद्धकोष्ठतेची समस्या जाणवतेय, मग आहारात करा  या  पदार्थांचा समावेश
बद्धकोष्ठतेची समस्या जाणवतेय, मग आहारात करा ' या ' पदार्थांचा समावेश
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: बद्धकोष्ठतेची समस्या (constipation problem) खूप त्रासदायक असते. त्यामुळे सूज येणे आणि ॲसिडिटीचा (acidity) त्रासही होऊ शकतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे घरगुती उपायही (home remedies) करून पाहू शकता. काही पदार्थांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. जाणून घेऊया कोणते उपाय केल्याने अथवा कोणते पदार्थ खाल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

प्लम

तुम्ही सुकलेले प्लम ( आलूबुखारा) खाऊ शकता. त्यामध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही फायबर असतात. प्लम हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याचे काम करते. त्यामध्ये सॉर्बिटॉल आणि फेनोलिक ही पोषक तत्वे असतात. ते बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याचे काम करतात.

अंजीर

अंजीरामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. त्यामध्ये फिकिन नावाचे एन्झाईमही असते. हे खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता दूर व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही आहारात अंजीराचा समावेश केला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये पालक, ब्रोकोली आणि इतर भाज्यांच्या समावेश आहे. या भाज्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही असतात. हिरव्या भाज्या आतड्यांना निरोगी ठेवण्याचे काम करतात. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतात.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यात अविद्राव्य (अघुलनशील) आणि विद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. तुम्ही आहारात चिया सीड्सचा अनेक पद्धतीने समावेश करू शकता. स्मूदी आणि कोशिंबीरमध्येही तुम्ही चिया सीड्स वापरू शकता.