Healthy Foods: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ हेल्दी पदार्थांचा समावेश

| Updated on: Oct 06, 2022 | 1:26 PM

वजन कमी करण्यासाठीहेल्दी डाएट म्हणजेच पौष्टिक परंतु योग्य आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच नियमितपणे पुरेसा व्यायाम करणेही गरजेचे आहे.

Healthy Foods: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा या हेल्दी पदार्थांचा समावेश
पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: वजन कमी करण्यासाठी (weight loss) खूप मेहनत घ्यावी लागते. नियमित व्यायामाबरोबरच (exercise) हेल्दी डाएट (diet) म्हणजेच पौष्टिक, सकस आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. आतुम्ही काही अशा पदार्थांचा आहारात (food) समावेश करु शकता, ज्यामुळे झपाट्याने वजन कमी करण्यास मदत होते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

बीन्स

तुम्ही छोले, राजमा यांसारख्या बीन्सजन्य पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ते स्नायू बळकट करण्याचे काम करतात. त्यांचे सेवन केल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते.

अंडी

अंडी ही प्रोटीन्सचा ( प्रथिनांचा) एक चांगला स्रोत आहेत. ते पोटाची चरबी कमी करण्याचे काम करतात. अंडी सेवन केल्याने आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्याचे सेवन केल्याने तुम्ही अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता.

हे सुद्धा वाचा

दही

दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात, ते आतडी स्वस्थ ठेवण्याचे काम करतात. तसेच ब्लोटिंगची समस्या दूर करतात. दह्यामध्ये प्रोटीन (प्रथिने) असतात. तुम्ही दह्याचे सेवन स्मूदीच्या स्वरुपातही करू शकता. दही हे पोटाची चरबी कमी करण्यास सहाय्य करते.

काकडी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच त्यामध्ये कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात असतात. काकडी हे शरीरातील विषारी पदार्थ ( टॉक्सिन) बाहेर टाकण्याचे काम करते. काकडीमुळे ब्लोटिंगची समस्या दूर होते. यामुळे बेली फॅट कमी होते.