Alcoholic fatty liver: दारू प्यायल्याने ‘लिव्हर’ होत आहे खराब, ‘या’ प्राथमिक लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

| Updated on: Jul 09, 2022 | 6:35 PM

Fatty Liver Warning Sign : फॅटी लिव्हरचा आजार आजच्या काळात सामान्य झाला आहे. जे, लोक जास्त दारू पितात, अशा लोकांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Fatty liver disease) होण्याची शक्यता असते. शरीरात सुप्तावस्थेत वाढणाऱ्या या आजाराची काही धोक्याची लक्षणे आहेत जी सुरवातीला दिसत नाहीत.

Alcoholic fatty liver: दारू प्यायल्याने ‘लिव्हर’ होत आहे खराब, ‘या’ प्राथमिक लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
दारू प्यायल्याने ‘लिव्हर’ होत आहे खराब
Follow us on

फॅटी लिव्हर डिसीज हा एक आजार आहे. ज्यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये जास्त चरबी (Excess fat) जमा होते. या आजारामुळे यकृत नीट काम करू शकत नाही. आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती या आजाराची लागण झालेला आढळून येत आहे. कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, मधुमेह, स्लीप एपनिया, सुप्तावस्थेतील ‘थायरॉईड’ हे फॅटी लिव्हर आजारामुळे हेावू शकतात. फॅटीलिवर रोगाला स्टीटोसिस(Steatosis) देखील म्हणतात. फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार आहेत. नॉन-अल्कोहोलिक आणि अल्कोहोल. जे, लोक जास्त दारू पितात, अशा लोकांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Fatty liver disease) होण्याची शक्यता असते. यकृत पूर्णपणे खराब झाल्यावर या आजाराची लक्षणे दिसतात. शौचातुन रक्त येणे हे त्याचे प्रारंभिक लक्षण आहे. असे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

काय? आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज

यकृत हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे जो कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करतो. विषारी पदार्थ फिल्टर करतो, पचनास मदत करतो आणि संसर्ग नियंत्रित करतो. अनियंत्रित मद्यपानामुळे यकृताच्या पेशी खराब होतात. यकृत स्वतःच बरे होत असले तरी जर कोणी सतत जास्त दारू प्यायले तर ही क्षमताही संपते.

अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे संकेत

ऑलीओ लुसोचे वैद्यकीय संचालक डॉ. मोनिका वासरमन यांच्या मते, “अति मद्यपान केल्याने शरीराचे लक्षणीय नुकसान होऊ शकते. जास्त मद्यपान केल्याने यकृताच्या ऊतींचे नुकसान होते. ज्यामुळे शौचातून रक्त येऊ शकते. “आणि यकृताचे सामान्य कार्य बाधित होते. जे लोक भरपूर दारू पितात, त्यांच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि त्यांना सूज येते. त्यामुळे शौचातून रक्त येते.”

हे सुद्धा वाचा

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग असा टाळावा

आपल्या जीवनशैलीत बदल करून फॅटी लिव्हरचे आजार टाळता येऊ शकतात किंवा कमी करता येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्येक माणसाच्या निरोगी यकृतामध्ये थोड्या प्रमाणात चरबी असते, परंतु जेव्हा हे प्रमाण यकृताच्या एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्क्यांपर्यंत पोहचते तेव्हा समस्या उद्भवते.
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग अतिमद्य प्राशनामुळे होतो, म्हणून ते टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे दारू पिणे बंद करणे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही दर आठवड्याला 14 युनिटपेक्षा जास्त अल्कोहोल न पिण्याचा सल्ला दिला जातो. हे प्रमाण दहा लहान ग्लास ‘लो-अल्कोहोल’ वाइनच्या सममूल्य आहे. या प्रमाणात अल्कोहोल तीन दिवसात प्यावे. जर तुम्ही वर्षानुवर्षे जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल तर ते कमी करणे किंवा बंद करणे चांगले.