बदाम साल काढून खाल्लेला चांगला की तसाच खाल्लेला चांगला? वाचा

| Updated on: Aug 20, 2023 | 10:08 PM

मिठाईवर सजावटीसाठीही बदामाचा वापर केला जातो. बदाम हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. बहुतेक लोक भिजवलेले बदाम खातात कारण यामुळे आरोग्यास अधिक फायदा होतो. पण आज आपण बदामांविषयी एका वेगळ्याच गोष्टीचे सत्य जाणून घेणार आहोत, बदाम भिजल्यानंतर सोलून घ्यावे की नाही?

बदाम साल काढून खाल्लेला चांगला की तसाच खाल्लेला चांगला? वाचा
almond peeled off
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: बदाम भिजवून मुलांना खायला दिल्यास डोकं तेज होते, असे म्हटले जाते. आजही लोक त्याचे पालन करतात. बदाम एक ड्रायफ्रूट आहे ज्याच्या सेवनाने आरोग्यास असंख्य फायदे मिळतात. तसेच अनेक प्रकारच्या आजारांमध्येही आराम मिळतो. मिठाईवर सजावटीसाठीही बदामाचा वापर केला जातो. बदाम हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. बहुतेक लोक भिजवलेले बदाम खातात कारण यामुळे आरोग्यास अधिक फायदा होतो. पण आज आपण बदामांविषयी एका वेगळ्याच गोष्टीचे सत्य जाणून घेणार आहोत, बदाम भिजल्यानंतर सोलून घ्यावे की नाही? खरं तर बदाम भिजवल्याने त्यात असणारी पोषक तत्वे वाढतात. बदामाच्या सालीत टॅनिन नावाचा पदार्थ असतो. यामुळे बदामातील पोषक द्रव्ये शोषली जात नाहीत. त्यामुळे काही लोक बदामाची साल खात नाहीत. पण त्याचबरोबर बदामाची साल काढून खाण्याचे इतरही फायदे आहेत.

बदामाची साल थोडी कोरडी आणि कडू असते. साल काढल्याने बदामाचा गोडवा वाढतो. तसेच साल काढून बदाम खाल्ले तर त्यात असणारी कीटकनाशके आणि रसायनेही आपल्या पोटात जाणे टाळतात. बदामाची साल आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. त्यामुळे बदामाची साल काढल्यानंतरही बदाम 100 टक्के शुद्ध आणि आरोग्यदायी असतात.

बदाम खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. बदामामध्ये चांगले फॅटी ॲसिड असतात, विशेषत: मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स जे आपल्या हृदयासाठी चांगले मानले जातात

वजन कमी करण्यासाठीही बदाम खूप उपयुक्त ठरतात. खरं तर बदामामध्ये फायबर, प्रोटीन आणि फॅट चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ते खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते.

भिजवलेली आणि त्याची साल काढून बदाम खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळीही टिकून राहते. बदामामध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.