अमेरिकेतील नोरोव्हायरसची लक्षणे कोणती ? काय उपाय करावेत ? घ्या जाणून

| Updated on: Jan 03, 2025 | 3:55 PM

America Norovirus: नोरोव्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. अमेरिकेत या व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. डिसेंबर महिन्यापासून नोरोव्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. काय आहे हा व्हायरस? याची लक्षणे कशी आढळतात आणि त्यापासून बचाव कसा करावा, याबद्दल जाणून घ्या.

अमेरिकेतील नोरोव्हायरसची लक्षणे कोणती ? काय उपाय करावेत ? घ्या जाणून
नोरोव्हायरसची लक्षणे कोणती ?
Image Credit source: Getty Images
Follow us on

America Norovirus: आज आम्ही तुम्हाला नोरोव्हायरस याविषयी माहिती देणार आहोत. अमेरिकेत नोरोव्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. डिसेंबरपासून आतापर्यंत या विषाणूचे 90 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. नोरोव्हायरस हा वेगाने पसरणारा आजार आहे. या नोरोव्हायरसविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या बऱ्याच भागांमध्ये नोरोव्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. नोरोव्हायरस म्हणजे काय? याची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध जाणून घ्या.

नोरोव्हायरस पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो. याच कारणास्तव, विषाणूला गॅस्ट्रोएन्टेरिटिस रोग देखील म्हणतात. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला उलट्या, अतिसार, पोटदुखी अशी लक्षणे आढळतात. काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी आणि सतत थकवा येण्याची ही समस्या असते.

दूषित अन्न-पाणी आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून हा आजार पसरतो. सहसा, बहुतेक प्रकरणे संक्रमित अन्नाची असतात. नोरोव्हायरसवर कोणताही निर्धारित उपचार नाही. लक्षणांच्या आधारे रुग्णावर उपचार केले जातात.

अमेरिकेत का पसरत आहे नोरोव्हायरस ?

डॉ. जुगल किशोर सांगतात की, नोरोव्हायरस हा काही नवीन आजार नाही. हा अनेक दशके जुना आजार आहे. 1968 मध्ये ओहायोतील नॉरवॉक येथील एका शाळेत या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी सापडलेल्या स्ट्रेनला नॉरवॉक व्हायरस म्हणून ओळखले जात होते. नंतर त्याला नोरोव्हायरस असे नाव देण्यात आले.

लक्षणे 1 ते 2 दिवसांत दिसतात

डॉ. किशोर सांगतात की, नोरोव्हायरस हा अमेरिकेतील एक सामान्य आजार आहे आणि त्याचे रुग्ण तेथे येत राहतात. हा विषाणू पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो. लक्षणे सहसा 1 ते 2 दिवसांत दिसून येतात आणि एका आठवड्यापर्यंत टिकू शकतात.

भारताला कोणताही गंभीर धोका नाही

नोरोव्हायरस प्राणघातक नाही आणि लक्षणे वेळीच ओळखून तो सहज रोखला जातो. मात्र, वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांना या विषाणूपासून वाचवण्याची गरज आहे. सध्या अमेरिकेत या व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. भारताला कोणताही गंभीर धोका नाही.

नोरोव्हायरसपासून बचाव कसा करावा?

नियमितपणे हात धुण्यास सुरुवात करा
दूषित अन्न आणि पाणी टाळा
संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळा.
पोटाचे काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)