नवी दिल्ली: भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या आतप्कालीन वापराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनानं (FDA)फेटाळला आहे. भारत बायोटेकची अमेरिकतील सहकारी कंपनी ओक्यूजेन आएनसीनं लसीच्या वापराला परवानगी मिळणवण्यासाठी बायोलॉजिक्स लायसन्स अॅप्लिकेशन करणार असल्याच सांगितलं आहे. ओक्यूजेन आयएनसी ही भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी आहे. आपत्कालीन वापराच्या परवानगीचा अर्ज नामंजूर केल्यानंतर एफडीएनं कंपनीला मार्ग सुचवला आहे. (American FDA rejects Bharat Biotech covaxin eua application)
ओक्यूजेन आयएनसी कंपनीनं सांगितलं की कोवॅक्सिन लसीच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून एफडीएच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त आकडेवारीसह कंपनी बीएलए अर्ज दाखल करेल. एफडीएकडून बीएलए अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे त्यानुसार लसींच्या वापराला मंजुरी दिली जाते. त्यामुळे अमेरिकेतील कोवॅक्सिन लसीच्या मंजुरीसाठी अजून वेळ जाऊ शकतो.
पीटीआयनं दिलेल्या बातमीनुसार ओक्यूजेन आयएनसी आता एफडीएकडे कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज करणार नाही. कारण, एफडीएनं कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवनागनी साठीअर्ज करण्याऐवजी बायोलॉजिक्स लायसन्स अॅप्लिकेशनसाठी अर्ज करावा सल्ला दिला आहे. त्यानुसार बीएलएसाठी अर्ज केला जाईल. मात्र, ईयूएसाठी अर्ज केला जाणारल नाही.
ओक्यूजेननं दिलेल्या माहितीनुसार यामुळे कोवॅक्सिन लस अमेरिकेत लाँच करण्यास वेळ लागू शकतो. एफडीएशी झालेल्या चर्चेनुसार ओक्यूजेनला कोवॅक्सिन लसीच्या अतिरिक्त क्लिनिकल ट्रायल कराव्या लागणार आहेत. ओक्यूजेनचे सीईओ शंकर मुसुनुरी यांनी सांगतिलं की, एफडीएनं बीएलए लायसन्ससाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे. यामुळे थोडा वेळ लागेल, मात्र कोवॅक्सिन लस अमेरिकेत आणण्यास कटिबद्ध आहोत, असं शंकर मुसुनुरी म्हणाले. शंकर मुनुसुरी यांनी कोवॅक्सिन लस कोरोनाच्या वेगवेगळ्या वेरियंटवर प्रभावी आहे. ओक्यूजेननं कॅनडामध्येही कोवॅक्सिन लसीच्या परवानगीसाठी मंजुरी मागितली आहे.
कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदींचा दिखावा; नवाब मलिक यांची टीकाhttps://t.co/Bi8Rh62DrB#bjp | #ncp | #nawabmalik | #PMNarendraModi | #CMYogiAdityanath
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2021
संबंधित बातम्या
Maharashtra Vaccination Record | महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी घोडदौड, दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 50 लाखांवर
(American FDA rejects Bharat Biotech covaxin eua application)