आरोग्यासाठी रोज फक्त एक आवळा! घरी बनवा आवळा मुरब्बा, वाचा रेसिपी!

| Updated on: Apr 26, 2023 | 12:35 PM

मुंबई: आवळा हे एक औषधी फळ आहे जे व्हिटॅमिन सी सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. आवळ्याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय आवळा खाल्ल्याने तुमचं शरीर आतून सुद्धा स्वच्छ होतं पण आवळा चवीला किंचित कडू असतो, त्यामुळे आवळा सहसा चटणी किंवा मुरब्बा बनवून खाल्ला जातो. आज आम्ही तुमच्यासाठी आवळा मुरब्बा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. […]

आरोग्यासाठी रोज फक्त एक आवळा! घरी बनवा आवळा मुरब्बा, वाचा रेसिपी!
Amla benefits
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: आवळा हे एक औषधी फळ आहे जे व्हिटॅमिन सी सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. आवळ्याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय आवळा खाल्ल्याने तुमचं शरीर आतून सुद्धा स्वच्छ होतं पण आवळा चवीला किंचित कडू असतो, त्यामुळे आवळा सहसा चटणी किंवा मुरब्बा बनवून खाल्ला जातो. आज आम्ही तुमच्यासाठी आवळा मुरब्बा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हा मुरब्बा चवीला आंबट-गोड असतो. याच्या सेवनाने तुमची त्वचा आणि केसही निरोगी राहतात. आवळ्याचा मुरब्बा बनवायलाही खूप सोपा आहे, तर चला जाणून घेऊया झटपट आवळा मुरब्बा कसा बनवायचा.

आवळा मुरब्बा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 15-20 आवळा
  • 1/4 टीस्पून वेलची पावडर
  • 2.5 कप साखर (चवीनुसार)
  • 1/2 चिमूट केशर

आवळा मुरब्बा कसा बनवावा?

  • आवळा मुरब्बा बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
  • यानंतर सुती कापडाच्या साहाय्याने एक-एक करून सर्व आवळे पुसून घ्या
  • मग काटा किंवा चाकूच्या साहाय्याने आवळ्याभोवती छिद्र तयार करा.
  • त्यानंतर एका कढईत 4-5 कप पाणी घालून मध्यम आचेवर गरम करावे.
  • नंतर गरम पाण्यात आवळा टाकून जास्त आचेवर सुमारे १० मिनिटे उकळून घ्यावा.
  • यानंतर गॅस बंद करा आणि आवळ्याचे पाणी वेगळे करा.
  • नंतर दुसऱ्या भांड्यात तीन कप पाणी आणि साखर घालून मध्यम आचेवर गरम करा.
  • यानंतर जेव्हा साखर विरघळेल तेव्हा त्याचे एकसारखे होऊन सरबत बनेल तेव्हा त्यात आवळा घाला
  • नंतर आवळा मंद आचेवर सुमारे 30 ते 40 मिनिटे शिजवून घ्यावा.
  • यानंतर या मिश्रणात आवळा नीट मिक्स करून झाला की गॅस बंद करा
  • मग ते थंड होण्यासाठी सोडा आणि थंड झाल्यावर आवळ्याला काचेच्या भांड्यात भरून घ्या.
  • यानंतर त्यांना सुमारे 4 तास ठेवून सोडून द्या.
  • यानंतर त्यात वेलची पूड आणि केशर घाला
  • नंतर तयार केलेल्या सिरपमध्ये पुन्हा आवळा घालून सुमारे 5 मिनिटे उकळून घ्यावा.
  • आता तुमचा हेल्दी आणि चविष्ट आवळा मुरब्बा तयार आहे.
  • मग ते थंड झाल्यावर काचेच्या डब्यात साठवून ठेवा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)