Weight Loss Tips: वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी ‘हे’ पदार्थ टाळा

| Updated on: Oct 17, 2022 | 12:29 PM

वजन कमी करायचे असेल तर व्यायामासोबतच पौष्टिक पण संतुलित आहार घेणेही तितकेच महत्वाचे आहे.

Weight Loss Tips: वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी हे पदार्थ टाळा
वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी 'हे' पदार्थ टाळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: वजन कमी करणे (weight loss) हे काही फार सोपं काम नाही. त्यासाठी मेहनत आवश्यक आहे. वजन कमी करायचे असेल तर व्यायाम (exercise)करण्यासोबतच पौष्टिक पण संतुलित आहार (proper diet) घेणेही तितकेच महत्वाचे आहे. अशा वेळी काही पदार्थांचे सेवन करणे, मुख्यत: संध्याकाळच्या वेळी असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. ते पदार्थ खाल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

हाय कॅलरी फूड

संध्याकाळच्या वेळेसे हाय कॅलरी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. त्यांचे सेवन केल्यास ते पदार्थ पचन तंत्र कमकुवत करण्याचे काम करतात. हाय कॅलरी असलेल्या पदार्थांऐवजी अशा पदार्थांचे सेवन करावे, ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात.

हे सुद्धा वाचा

फ्रोजन पदार्थ

फ्रोजन (गोठवलेले पदार्थ) पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप अधिक असते. अशा पदार्थांचे संध्याकाळी सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

साखरयुक्त पेय

तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर संध्याकाळच्या वेळेस साखरयुक्त पेयांचे सेवन करणे टाळावे. त्यामध्ये कॅलरीज खूप प्रमाणात असतात. ह्या अशा पेयांचे सेवन केल्यास वजन जलदरित्या वाढू शकते. तसेच लसाखरयुक्त पेय प्यायल्यास ब्लोटिंगच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो.

चीज

चीज हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळच्या वेळेस चीज बिलकुल खाऊ नये. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. तसेच त्यामध्ये सोडिअमही असते. जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढवते. संध्याकाळी चीजचे सेवन केल्याने वजन वेगाने वाढते.