Health Tips In marathi : सध्या जीवन हे खूप गतीमान बनले आहे. प्रत्येकाला कामाचे टेंशन असते, त्यामधून अनेकदा धावपळ होते. अशा परिस्थितीमध्ये तुमचे खाण्याकडे दुर्लक्ष होते. खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे अनेक गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर होतात. तुमच्या शारीरीक हालचालींवर (physical activity) देखील त्याचा परिणाम होतो. खाण्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास वयाच्या चाळीसीनंतर व्यक्तींना ब्लड प्रेशर (Blood pressure), थायरॉईड, पीसीओडी (pcod), मधुमेह यासारखे विविध आजार होतात. आपण जे खातो त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. तुम्ही जर दररोज वेळच्यावेळी पोष्टीक अन्नाचे सेवन केले तर तुम्ही दीर्घकाळासाठी निरोगी राहू शकता. मात्र तेच जर तुम्ही सतत फास्ट फूड किंना इतर स्ट्रीट फूड खात असाल तर तुम्हाला विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही अशा गोष्टी असतात ज्याचे सेवन जेवन झाल्यानंतर करणे तुमच्या आरोग्यसाठी अतिशय हानिकारक असते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
अनेकांना जेवन झाल्यानंतर चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक अशी आहे. तुम्हालाही जर अशीच सवय असेल तर वेळीच सावध व्हा. जेवनानंतर चहा किंवा कॉफी घेतल्यास त्याचा परिणाम हा तुमच्या पचनशक्तीवर होतो, त्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी पित्तासारख्या समस्येंचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते जेवनापूर्वी एक तास व जेवनानंतर एकतास कॉफी किंवा चहाचे सेवन टाळावे. तुम्ही जर जेवनानंतर लगेचच चहा घेत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाणत कमी होते. ज्यामुळे तुम्हाला थकवा येणे, अशक्तपणा वाटणे अशा विविध समस्या जाणू शकतात.
तुम्ही जर जेवना नंतर लगेचच मद्याचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक असते. ज्याचा परिणाम हा तुमच्या पचनसंस्थेवर होतो. तसेच यामुळे आतड्याचे विविध आजार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे जेवणापूर्वी किंवा जेवनानंतर कमीत कमी अर्धा ते एक तास मद्य न पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
असे अनेक लोक आहेत ज्यांना जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढण्याची सवय असते. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर आजच ही सवय बदला. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढल्याने इरिटेबल बोवेल सिंड्रोम नावाचा आजार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे पोटाचा अल्सर होऊ शकतो.
उन्हाळ्यात प्रत्येकजण जेवल्यानंतर थंड पाणी पितात, मात्र ही सवय चुकीची आहे. तसे केल्यास तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिल्यास अन्नाचे निट पचत होत नाही. तसेच तुमची पचन शक्ती देखील कमी होते. खाल्ल्यानंतर साधारणपणे 30 ते 45 मिनिटांनी थंड पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Budget 2022: सरकार हेल्थकेअर क्षेत्रात मोठ्या बदल करण्याच्या तयारीत? काय असणार आहे नेमका प्लान
Health : फुफ्फुसाला ठेवायचं आहे निरोगी मग टाळा ‘या’ गोष्टी…
Immunity : ‘या’ 5 गोष्टी ठेवा चार हात लांब, नाहीतर रोगप्रतिकारक शक्तीवर होईल गंभीर परिणाम!