नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा (cold wave) कडाका भलताच वाढला आहे. थंडीमुळे उत्तर भारतात ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट ॲटॅकच्या केसेसही वाढल्या आहेत. या ऋतूमध्ये जराशी थंड हवा लागल्यास आपल्याला सर्दी-खोकला आणि ताप येणे (fever) अशा समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हालाही थंडीतील आजारांपासून (falling sick) संरक्षण करायचे असेल तर काही चुका करणे टाळावे व काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
थंडीत हायड्रेटेड रहावे
थंडीत डिहायड्रेशनचा त्रास खूप सामान्य आहे, कारण या काळात लोकं खूप कमी पाणी पितात. थंडीत जास्त तहान लागत नाही, त्यामुळे कमी पाणी प्यायले जाते, मात्र हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व खूप फळही खावीत.
आहारात करा या पदार्थांचा समावेश
कडाक्याच्या थंडीत स्वत:ची नीट काळजी घेणे महत्वाचे आहे. या काळात शरीराला गरम, उबदार ठेवणारे पदार्थ खावेत. थंडीत तीळ, गूळ आणि ड्रायफ्रुटसचे सेवन करावे. तसेच चहामध्ये आलं, दालचिनी आणि काळी मिरी वापरावी. याने चहाचा स्वाद वाढेलच पण आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील.
वृद्ध नागरिकांनी घ्यावी काळजी
थंडीत वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो , त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. वृद्ध व्यक्तींनी पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहावे आणि खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी. जर ताप किंवा एखादा संसर्ग झाल्यास डॉक्टरांकडे जावे. वृद्धांनी थंड हवेत जास्त काळजी घ्यावी. बाहेर जाताना पुरेशी काळजी घ्यावी, गरम कपडे घालावेत.
बंद खोलीत शेकोटी पेटवू नका
थंडीत बरेच जण उबेसाठी शेकोटी पेटवू नका, पण शक्यतो ती घरात पेटवू नका. बरेच वेळेस लोकं बंद खोलीत शेकोटी पेटवतात, पण हे धोक्याचे ठरू शकते.
ॲक्टिव्ह रहावे
थंडीत बरेच जण व्यायाम करणे टाळतात, आणि घरातच बसून राहतात. पण असे करू नये. एकाच जागी बसल्याने आणखी थंडी वाजते. चालत-फिरत राहिल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. मात्र खूपही फिरू नये. थकवा आल्यास थोडा वेळ आराम करावा.
थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य व गरम कपडे घालावेत. हात, पाय, कान व डोकं पूर्ण झाकणारे कपडे घातल्यास थंडीचा त्रास होत नाही.