उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावं हे माहित आहे, पण कोणते पदार्थ खाऊ नयेत?

| Updated on: Apr 09, 2023 | 3:54 PM

उलट्या, पोटदुखी सारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांनी जास्त पाणी प्यावं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की उन्हाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळावेत. चला तर मग जाणून घेऊया.

उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावं हे माहित आहे, पण कोणते पदार्थ खाऊ नयेत?
Avoid this food in summer
Follow us on

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. अशावेळी जर तुम्ही योग्य आहार घेतला नाही तर तुमची तब्येत बिघडू शकते. होय, उन्हाळ्याच्या ऋतूत लोक लवकर आजारी पडतात, त्यामुळे तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी. इतकंच नाही तर उलट्या, पोटदुखी सारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांनी जास्त पाणी प्यावं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की उन्हाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळावेत. चला तर मग जाणून घेऊया.

उन्हाळ्याच्या ऋतूत खाऊ नका ‘या’ गोष्ट

मिरची मसाले

उन्हाळ्यात लोकांनी मिरची मसाले कमी करावेत. कारण ड्राय मिरची, गरम मसाला तुमच्या शरीरातील उष्णता वाढवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत मसालेदार पदार्थ कमी खावे. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या देखील उद्भवू शकते, म्हणून हे टाळले पाहिजे.

चहा-कॉफीपासून दूर राहा

उन्हाळ्याच्या ऋतूत चहा-कॉफीचे सेवन कमी करावे. कारण त्यांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढण्याचे काम होते. त्यामुळे उन्हाळ्यात चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा उसाचा रस, नारळाचे पाणी प्यावे.

लोणचे

लोकांना लोणचे खायला आवडतात. कारण लोणच्याचे सेवन केल्याने अन्नाची चव वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की लोणचे तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. कारण लोणच्यात सोडियमचे प्रमाण असते ज्यामुळे अपचन, पोटात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात लोणच्याचे सेवन करणे टाळावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)