Ayurvedic tips : आयुर्वेदात (Ayurveda) सांगितल्यानुसार तुमचे स्वयंपाकघर (Kitchen) हे आवश्यक पोषक तत्वांचे भांडार आहे. स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले (Spices) असतात जे पदार्थांमध्ये वापरले जातात. हे मसाले बाजारात सहज मिळतात. मसाले जेवणाची चव तर वाढवतातच पण तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. या मसाल्याच्या नियमित सेवनाने तुमचे वजन तर कमी होतेच याशिवाय तुमच्या शरीरातील डिटॉक्स कमी करण्यासाठी देखील त्यांची मदत होते. या मसाल्यांमध्ये दालचिनी, जिरे, धणे आणि हिंग यांसारख्या मसाल्यांचा समावेश होतो. हे मसाले तुमची पचनसंस्थाही निरोगी ठेवतात. तसेच असे अनेक मसाल्यांचे पदार्थ असतात, ज्यांच्या घरगुती उपयोगाने तुम्ही सर्दी, खोकल्या सारख्या आजारांपासून दूर राहतात. आज आपण अशाच काही मसाल्यांच्या पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
आले हा एक प्रसिद्ध असा मसाल्याचा पदार्थ आहे. आल्याचा वापर हा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात होतो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असताता त्यामुळे आयुर्वेदात आल्याला महत्त्व आहे. आल्याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच पोटातील पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढतो, हा स्राव पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो. जेवणात आल्याचा समावेश करण्यासोबतच तुम्ही आल्यापासून बनवलेल्या चहाचेही सेवन करू शकता.
दालचिनीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे सर्दीस कारणीभूत असलेल्या विषाणूंशी लढण्यास मदत करते. यात दाहकविरोधी गुणधर्म देखील आहेत जे घसा दुखीपासून आराम देतात.
जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
या मसाल्याच्या पदार्थामध्ये उष्णताविरोधी गुणधर्म आहेत. पोटात जास्त उष्णतेमुळे ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होत असलेल्या लोकांसाठी कोथिंबीरीचे नियमित सेवन चांगले मानले जाते. पोट फुगण्याच्या समस्येवर देखील कोथिंबीर एक चांगले औषध आहे.
हिंगाला सुवासिक असा वास असतो, पचन सुधारण्यासाठी विविध अन्नपदार्थांमध्ये हिंगाचा उपयोग केला जातो. हिंगाच्या नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत होते. तसेच पोटदुखीवर देखील हिंग हा रामबाण उपाय आहे.
हळदीचा वापर बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये केला जातो. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला अतिशय महत्त्व आहे. हळदीच्या सेवनामुळे पित्त दोष दूर होतात. तसेच हळदीमुळे तुमची इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते. हळदीच्या नियमित सेवनाने सांधेधुखीपासून देखील आराम मिळतो.
Budget 2022 : आता सर्व आरोग्य सुविधा एकाच प्लेटफॉर्मवर, अर्थमंत्र्यांकडून नव्या पोर्टलची घोषणा!
Budget 2022 :तणाव, नैराश्यमुक्तीसाठी विशेष कार्यक्रम राबवणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!