नवी दिल्ली: कोरोना महामारी नंतर मानसिक समस्या (mental health) खूप वाढल्या आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तुम्हालाही एखाद्या कारणाशिवाय चिंता वाटणं, एकटं राहण्याची इच्छा होणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणं आणि मानसिक ताण अशा समस्या (problems) भेडसावत असतील तर त्याकडे नक्की लक्ष द्या. ही सर्व खराब मानसिक स्वास्थ बिघडण्याची सुरुवातीची लक्षणं आहेत. याची वेळीच काळजी घेतली नाही तर मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. ज्यामुळे शरीरात इतरही (health problems) अनेक आजार वाढू शकतात.
इंटरनल मेडिसिनचे डॉक्टर अजित कुमार यांच्या सांगण्यानुसार, मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे हृदयरोगाचाही धोका असतो. मानसिक ताणामुळे होणारी जळजळ उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
जर एखादी व्यक्ती नेहमी चिंतेत असेल किंवा मानसिक तणावाखाली असेल, तर त्यामुळे त्या व्यक्तीची जीवनशैली बिघडते. तसेच शरीरातील लठ्ठपणाची समस्याहा वाढू लागते. लठ्ठपणामुळे बीएमआय उच्च होतो आणि शरीरावर गंभीर परिणाम होतो. वाढलेले वजन हे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकते.
कोविडनंतर हार्ट ॲटॅकचे रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे, बिघडत चाललेलं मानसिक आरोग्य. चिंतेची बाब म्हणजे तरुणाई मोठ्या संख्येने या समस्येला बळी पडत आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे शरीरात तणाव वाढतो.
यामुळे (शरीरात) कॉर्टिसॉल हार्मोन अधिक तयार होऊ लागतो आणि मेटाबॉलिज्म चांगले रहात नाही. कॉर्टिसॉल हार्मोनमुळे त्या व्यक्तीला खूप गोड आणि फॅट्सयुक्त (चरबीयुक्त) पदार्थ खाण्याची सवयही लागते. या सर्वांमुळे वजन वाढते, ज्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
द लॅंसेट मेडिकल जर्नल मध्ये 2020 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मानसिक आरोग्य चांगले नसेल तर टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका असतो. अनेक रुग्ण ज्यांचे मानसिक आरोग्य चांगले त्याच्या नव्हते, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. तर काही रुग्ण मधुमेहपूर्व अवस्थेतही असल्याचेही आढळले.
– विनाकारण मानसिक ताण घेऊ नका.
– झोपेची पद्धत योग्य ठेवा, लौकर झोपन सकाळी लवकर उठावे.
– दररोज व्यायाम करावा आणि ॲक्टिव्ह रहावे.
– सोशल मीडियाचा वापर कमी करा.
– एकटं वाटत असेल तर मित्रांना भेटा.
– दिवसभरात तुमच्या कामाव्यतिरिक्त आवडता छंद जोपासा, त्या संबंधित एखादे काम करा.
– विनाकारण काळजी वाटत असेल किंवा तुम्ही विचार करत असाल तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.