Apple Cider Vinegar Benefits : हिवाळ्यात शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. वातावरणातील गारव्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्या होतात. निरोगी शरीरासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे अस्ते. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, अँटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी यासारख्या घटकांचा समावेश केल्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते. अनेकजण त्यांच्या आहारामध्ये अॅपलसाईडेड व्हिनेगरचा वापर करतात, अॅपलसाईडेड व्हिनेगरच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
अॅपलसाईडेड व्हिनेगरचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. कोणताही खाद्यपदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. व्हिनेगरच्या वापरामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते त्यासोबतच तुमचे वजन कमी होऊन नियंत्रित रहाण्यास मदत होते. व्हिनेगरमध्ये अॅसिडिक प्रॉपर्टिज आढळतात ज्यामुळे तुमचं पेट साफ होण्यास मदत होते.
हेल्दी आणि निरोगी जिवनशैलीसाठी तज्ञांकडून अॅपलसाईडेड व्हिनेगरचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अॅपलसाईडेड व्हिनेगर बनवण्यासाठी सफरचंदाचा वापर केला जातो. जगभरामध्ये अॅपलसाईडेड व्हिनेगरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अॅपलसाईडेड व्हिनेगरचा आहारामध्ये समावेश केल्यास कमी भूक लागते ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते आणि वजन नियंत्रित रहाते. रक्तदाबाच्या समसया असलेल्या रुग्णांसाठी अॅपलसाईडेड व्हिनेगर अत्यंत फायदेशीर ठरते. दररोज सकाळी रिकाम्यापोटी अॅपलसाईडेड व्हिनेगर कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित रहाण्यास मदत होते. . व्यायाम करण्यापूर्वी दररोज कोमट पाण्यासोबत एक चमचा अॅपलसाईडेड व्हिनेगर प्या. याच्या सोवनामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते आणि दिवसभर तुम्ही एनर्जेटिक फिल करता.
अॅपलसाईडेड व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते. अॅसिटिक अॅसिडमुळे शरीरातील पॅट कंट्रोलमध्ये रहाण्यास मदत होते. सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यामध्ये अॅपलसाईडेड व्हिनेगर मिसळून प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अॅपलसाईडेड व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे अॅपलसाईडेड व्हिनेगर मिसळून प्या. या पेयाचे सेवन तुम्ही दिवसातून दोनवेळा सेवन करा. अॅपलसाईडेड व्हिनेगरमुळे शरीरातील अनेक आजार कमी होण्यास मदत होते.