हा चहा आरोग्यासाठी आहे प्रचंड फायदेशीर, वजनदेखील होते कमी! वाचा कसा बनवणार

| Updated on: May 04, 2023 | 11:44 AM

एवढंच नाही तर रोज जेवणानंतर अर्धा तास दालचिनीचा चहा प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया दालचिनी चहा कसा बनवावा.

हा चहा आरोग्यासाठी आहे प्रचंड फायदेशीर, वजनदेखील होते कमी! वाचा कसा बनवणार
Dalchini Chai
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: दालचिनी हा एक मसाला आहे जो दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. अन्नाची चव वाढवण्यासाठी लोक दालचिनीचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का दालचिनीचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी दालचिनी चहा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. दालचिनी चहा प्यायल्याने आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यासोबतच हे तुमचं मेटाबॉलिझम वाढवतं. पोट फुगणे किंवा गॅसची समस्या दूर करण्यासाठी दालचिनी चहा उपयुक्त आहे. एवढंच नाही तर रोज जेवणानंतर दालचिनीचा चहा प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया दालचिनी चहा कसा बनवावा.

दालचिनी चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • पाणी 1 कप
  • दालचिनी पावडर 1 चमचा
  • काळी मिरी 1 चिमूट
  • मध 1 चमचा
  • लिंबाचा रस थोडा

दालचिनी चहा कसा बनवावा?

  • दालचिनीचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात एक कप पाणी टाका.
  • नंतर त्यात दालचिनी पावडर, काळी मिरी आणि लिंबाचा रस घाला.
  • त्यानंतर हे मिश्रण चांगले उकळून घ्यावे.
  • नंतर एका कपमध्ये गाळून त्यात मध घालून मिक्स करा.
  • आता आपला निरोगी दालचिनी चहा तयार आहे.
  • पोटाची चरबी जाळण्यासाठी हा चहा रोज रात्रीच्या वेळी प्यावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)