Soak raisins
Image Credit source: Social Media
गोड मनुक्याची चव कोणाला आकर्षित करत नाही? आपण अनेकदा ते थेट खातो. मिठाईपासून पुलावांपर्यंत सगळ्यात मनुक्याचं वापर केला जातो. आपण बऱ्याचदा या ड्रायफ्रूट्सच्या सर्व फायद्यांबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी मनुक्याचे पाणी प्यायलंय का? जर तुम्हाला याचे फायदे माहित नसतील तर तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल.
मनुका खाण्याचे फायदे
- मनुकामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. बरेच आहारतज्ञ हे भिजवून खाण्याचा सल्ला देतात, मानसिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम आहार मानला जातो, तसेच वजन कमी करण्यास मदत होते.
- मनुक्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हल्ली विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव खूप दिसून येत आहे, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. मनुक्याचे पाणी आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवते, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होते.
- शरीरात असलेले विषारी घटक मर्यादेपेक्षा जास्त जमा झाले तर अनेक आजारांचा धोका वाढतो. जे लोक नियमितपणे मनुका पाणी पितात त्यांच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे यकृत निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.
मनुक्याचे पाणी कसे तयार करावे?
मनुक्याचे पाणी तयार करण्यासाठी एका कढईत एक ग्लास पाणी टाकून उकळावे. आता त्यात मनुका घालून रात्रभर भिजत ठेवायला ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी गाळून प्यावे.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)