Peanut butter benefits
Image Credit source: Social Media
मुंबई: पीनट बटर एक निरोगी अन्न आहे. यात चांगल्या आरोग्यासाठी प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, मॅग्नेशियम, तांबे आणि मॅंगनीज यासारखे अनेक पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. याशिवाय व्हिटॅमिन बी 5, झिंक, पोटॅशियम, लोह आणि सेलेनियम देखील यात आढळतात. हे पोषक घटक वजन कमी करण्यास, हृदयरोगाशी लढण्यास आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात. सकाळी आणि संध्याकाळी कुठल्याही वेळी तुम्ही पीनट बटर हे खाऊ शकता. एक चमचा पीनट बटरमध्ये 8 ग्रॅम प्रोटीन असते, जे अंड्यापेक्षा जास्त आहे. अंड्यात 6 ग्रॅम प्रथिने असतात. जाणून घेऊया दररोज पीनट बटर खाण्याचे कोणते फायदे आहेत.
- पीनट बटरमध्ये उच्च प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतात. हे वजन वाढण्यास प्रतिबंध करते आणि निरोगी वजन राखण्यास मदत करते.
- पीनट बटरमध्ये असलेले मोनो अनसेटेड फॅट्स निरोगी हृदयासाठी चांगले असतात. हे आपल्याला हृदयरोगापासून वाचविण्यास मदत करते.
- पीनट बटर हा एक चांगला प्रथिने स्त्रोत आहे. एक चमचा पीनट बटरमध्ये 8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे हे रोज खाणं आपल्या शरीरासाठी उत्तम असतं.
- पीनट बटरमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते जे आपल्याला भूक कमी करण्यास मदत करते. हे खाल्ल्याने फारशी भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- पीनट बटरमध्ये व्हिटॅमिन ई, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात. हे सर्व महत्वाचे पोषक घटक आपल्या शरीराच्या निरोगी विकासास मदत करतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)