सध्या बाजारात लिची आणि टरबूजची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. फळे आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे अनेक जण फळं खाण्यावर भर देतात. पण ही फळे घरी आणण्यापूर्वी ती खाण्यायोग्य आहेत की नाही हे आपल्याला माहित नसते. आजकाल बाजारात लिची आणि टरबूज मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. पण ते खाल्ल्याने जर तुमचे आरोग्य बिघडू शकते. असं तुम्हाला सांगितलं तर तुमची ही चिंता वाढू शकते. कारण ही बनावट फळे तुम्ही जास्त वेळ खाल्ल्यास तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता. ही फळे विकत घेण्यापूर्वी फक्त 2 रुपयात चांगली आहेत की नाही हे जाणून घेऊ या.
आता बनावट फळे म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की, ही फळे प्लास्टिक किंवा रबरची आहेत का तर असे नाही. तसेच ते लॅबमध्ये तयार केले गेले आहे का असाही त्याचा अर्थ नाही. बनावट फळे म्हणजे जे चुकीच्या पद्धतीने पिकवली जातात ते. ही फळे चांगली आणि लाल दिसण्यासाठी यामध्ये हानिकारक रंगांचा वापर केला जातो.
भेसळ करणारे टरबूज आतून लाल दिसावा म्हणून इंजेक्शन टोचून त्यात लाल रंग टाकला जातो. याशिवाय त्यांना गोड बनवण्यासाठी साखरेच्या पाकाचा वापर केला जातो. त्याप्रकारे हिरवी लिची पिकलेली दिसावी म्हणून त्याच्यावर लाल रंगाची फवारणी केली जाते. लिची गोड लागावी म्हणून त्यावर लहान छिद्र करुन ती पाकात ठेवली जातात. काही वेळाने ती बाहेर काढून विकली जातात.
तुम्ही विकत घेत असलेले फळे हे योग्य आहे नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कापूसचा वापर करायचा आहे. हा कापूस तुम्ही लिचीवर घासला तर त्याच्यावर लाल रंग येत असेल तर समजा त्यावर रंग फवारणी केली आहे. टरबूजमध्ये देखील लाल रंग टाकला आहे की नाही यासाठी तुम्ही कलिंगड कापल्यानंतर तो कापसावर घासून पाहा. जर कापूस लाल होत असेल तर त्यात इंजेक्शनने रंग टाकला गेला आहे.